31 डिसेंबर व नववर्षे स्वागतासाठी पोलीस प्रशासन सज्ज
नांदेड – दि 30 नांदेड शहरात व जिल्हयात 31 डिसेंबर व नववर्षे स्वागतासाठी तरुणाई मोठयाप्रमाणात सार्वजनिक रोडवर साजरा करतात. सद्या नांदेड शहरात महानगर पालीका निवडणुक अनुषंगाने आदर्श आचार संहिता लागु आहे. 31 डिसेंबर व नववर्षे स्वागतासाठी हर्ष साजरा करीत असतांना जनतेने आदर्श आचार संहितेचे व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.
नववर्षाचे पुर्व संध्येला नांदेड पोलीस दलातर्फे नांदेड शहरात व ग्रामिण भागात मोठया प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असुन महत्वाचे ठिकाणी नाकाबंदी, ड्रींक & ड्राईव केसेस, ब्रिथ अॅनालाईजर तपासणी करण्यात येणार आहे. चौका चौकत CCTV तसेच हॅन्ड सेल्फ कॅमेराचे माध्यमातुन निगराणी ठेवण्यात येत आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करुन वाहनाची कसुन तपासणी केली जाणार आहे. रसत्यावर हूल्लडबाजी करणाऱ्यांवर, रसत्यावर दारु पिनारे, रसत्यावर केक कापनारे, बुलेटचा आवाज काढणारे, दारु पिऊन गाडी चालवनारे इसमावर कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.
नांदेड शहरात व जिल्हयात 31 डिसेंबर व नववर्षे स्वागतासाठी पोलीस प्रशासनाचे वतीने 01 पोलीस अधीक्षक, 02 अपर पोलीस अधीक्षक, 09 उप उविभागीय पोलीस अधिकारी, 40 पोलीस निरीक्षक, 170 पोलीस अधिकारी, 1200 पोलीस अंमलदार, 12 दंगा नियंत्रण पथक, 20 स्ट्रायकिंग, 1300 होमगार्ड असा पोलीस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. नांदेड शहरात व जिल्हयात 31 डिसेंबर व नववर्षे स्वागत बंदोबस्त शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असुन नागरीकांना काही तक्रार असल्यास डायल-112 किंवा जवळील पोलीस स्टेशनला तक्रार करण्यास सांगुन कायदा कोणी हातात घेवु नये, कायदा हातात घेणाऱ्यांची गय केला जाणार नसल्याची संदेश मा. पोलीस अधिक्षक यांनी दिला आहे.











