एक जानेवारी पासून नवीन रेल्वे वेळापत्रक लागू
दक्षिण मध्य रेल्वे ने दिनांक 01.01.2026 पासून नवीन रेल्वे वेळापत्रक लागू केले आहे. नवीन
वेळापत्रकात काही प्रमुख रेल्वे स्थानकांवर गाड्यांच्या वेळामध्ये बदल करण्यात आले आहेत.अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कामले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
यात्रेकरूंनी प्रवास सुरू करण्यापूर्वी भारतीय रेल्वे चौकशी प्रणाली, रेल्वे ची अधिकृत वेबसाइट (www.indianrailways.gov.in), स्टेशन चौकशी कार्यालय किंवा स्टेशन मास्टर यांच्याकडून नवीन वेळापत्रकाची तपासणी करावी.
ज्या यात्रेकरूंनी 01 जानेवारी 2026 किंवा त्यानंतरचा प्रवासासाठी तिकीट आरक्षित केले आहे, त्यांनी आपल्या संबंधित ट्रेनच्या अद्ययावत वेळेची तपासणी करावी.
भारतीय रेल्वे आपल्या यात्रेकरूंना सुरक्षित, विश्वासार्ह आणि वेळेवर ट्रेन सेवा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही आपल्या सततच्या समर्थन आणि सहकार्याबद्दल आभारी आहोत.असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
प्रवाशानी विशेष करून दीक्षाभूमि एक्सप्रेस, निझामाबाद – पुणे एक्सप्रेस, पंढरपूर – निझामाबाद एक्सप्रेस, जन शताब्दी एक्सप्रेस, नांदेड-फिरोजपुर एक्सप्रेस, हिसार एक्सप्रेस, साईनगर शिर्डी एक्सप्रेस, तपोवन एक्सप्रेस, तिरुपती एक्सप्रेस, नगरसोल एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस, नागावली एक्सप्रेस, च्या वेळे विषयी माहिती घेवूनच प्रवास करावा.
– निलंगेकर विजय











