वंचित ची नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर नांदेड
नांदेड – वाघाळा शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एम आय एम या पक्षाच्या नंतर वंचित ने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे उमेदवारांची नावे जाहीर करण्यामध्ये वंचित ची आघाडी असली तरी काँग्रेस पक्षासोबत होणारी आघाडीचे काय असा प्रश्न आता मतदारांना पडला आहे.
कालच मुंबई येथे मुंबई येथील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि वंचित या दोन्ही पक्षाची आघाडी होऊन वंचितला 62 जागा मिळाल्याच्या घोषणा करण्यात आली या आघाडीचा महाराष्ट्रात आनंद साजरा होत असतानाच नांदेडमध्ये नऊ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली यामुळे नांदेडमध्ये वंचित आणि काँग्रेसचे जुळेल का नाही असा संभ्रम आता मतदारांमध्ये निर्माण झाला आहे नगरपरिषदेच्या निवडणुकांमध्ये नांदेडमध्ये काँग्रेस सोबत झालेली आघाडी फिस्कटल्यामुळे महानगरपालिका मध्ये वंचित काँग्रेस सोबत जाण्यात इच्छुक नसल्याचे वंचितच्या कार्यकर्त्यांमध्ये बोलल्या जात आहे त्यामुळेच की काय आपली यादी जाहीर करून निवडणुकीचे बिगुल वाजवला आहे वंचित बहुजन आघाडी पक्षाने प्रभाग क्रमांक तीन अ मधून विशाखा साहेबराव पंडित तीन ब विजया ज्ञानदेव चौधरी तीन क सलमा बेगम मोहीम शेख तीन राहुल अनंतराव पवार तर प्रभाग क्रमांक 20 अ दीपमाला विठ्ठल गायकवाड वीस ब सिमरन कौर गोपाल सिंग टाक 20 क महेश नारायण निळकंठवार वीस ड शीतल यशवंत आव्हाळे तर वीस इ मधून अमृत दशरथराव नरंगलकर यांना मैदानात उत्तर दिले आहे
प्रभाग क्रमांक 20 मधून सर्व एकनिष्ठ कार्यकर्त्यांना तिकीट मिळाल्याने या प्रभागात आनंद व्यक्त करण्यात येत असून इतर प्रभागातही एकनिष्ठांनाच उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आता कार्यकर्त्यांमध्ये वाढली आहे











