नांदेड – नांदेड येथील प्रसिद्ध व्यावसायिक प्रशांत पालदेवार यांना जमिनीच्या वादातून त्यांच्याच जमिनीवर मारहाण केल्याचि घटना घडली आहे
विद्युत भवनच्या मागे तथा हिंगोली नाको उड्डाण पुलशेजारी असलेल्या भूखंडाचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून न्यायप्रविष्ट असताना या जागेवर आपला दावा करणाऱ्या उमाजी रेड्डी यांनी या जागेवर जेसीबी आणून स्वच्छता करत असल्याचे समजतात तेथे जावून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणारे प्रशांत पालदेवार व त्यांच्या कुटुंबीयांना रेडी यांनी मारहाण करण्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. दरम्यान मारहाणीत जखमी झालेल्या पालदेवार व त्यांच्या मत्नीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रेडी व त्यांच्या लोकांनी मला मारहाण केली, असे पालदेवार यांचे म्हणणे होते.
विद्युत भवनच्या मागे असलेल्या एका जमिनीचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहे. या जागेवर शनिवारी उमाजी रेड्डी हे जेसीबीच्या साहाय्याने स्वच्छता
करत होते. ही माहिती मिळताच प्रशांत पालदेवार हे आपल्या कुटुंबासह त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी ही जागा न्यायप्रविष्ट असल्याने स्वच्छता करण्यास विरोध केला. यावरून झालेल्या शाब्दिक चकमकीचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी रेड्डी यांनी पालदेवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली.
या हाणामारीत पालदेवार व त्यांच्या पत्नीला दुखापत झाली आहे. ते उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाले. प्रशांत पालदेवार यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जमिनीची सर्व कायदेशीर कागदपत्रे त्यांच्याकडे असून जागा जागा त्यांच्या मालकीची आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.











