Home / राज्य / त्या वृत्ताचा पोलिस निरीक्षक चिंचोलकर यांचा खुलासा व त्यास उत्तर

त्या वृत्ताचा पोलिस निरीक्षक चिंचोलकर यांचा खुलासा व त्यास उत्तर

त्या वृत्ताचा पोलिस निरीक्षक चिंचोलकर यांचा खुलासा व त्यास उत्तर

नांदेड – जिल्हाधिकारी कर्डिले यांनी विना नंबरच्या हायवा पकडली हे वृत्त प्रकाशित करताना सम्यक ने पाण्यामध्ये उड्या मारून अवैध रेती पकडल्याची आठवण करून त्यांना हे हायवा दिसल्या नाहीत का असे प्रश्न निर्माण केले त्यावर पोलिस निरीक्षक चिंचोलकर यांनी पाठवलेली खुलासा खाली देत आहोत तर त्यावर छोटेसे उत्तर ही देत आहोत

अर्धवट माहितीच्या आधारावर काही छापत जाऊ नका.

आमचा पाण्यात उड्या मारण्याचा रेफरन्स घेण्याची या कारवाईत काही गरज नाही

मुरमाच्या गाड्या ओव्हरलोड असणे गाड्यांचे फिटनेस याच्यामध्ये आमचा काही संबंध नाही

यासाठी स्वातंत्र्य डिपार्टमेंट आहे Rto ते आपण विसरलात का का वेगळा अर्थ आहे त्यांचं नाव न घेण्याचा.

मुरूम हा वैद्य आहे का अवैद्य आहे जास्त उपसा केलेला आहे का हा भाग महसूल विभागाशी निगडित आहे

कायद्याप्रमाणे ते आमचे प्राथमिक काम नाही क्राइम कंट्रोल लायन ऑर्डर हा पोलिसांचा मुख्य भाग आहे

मुरूम उत्खनन हे महसूल डिपारमेंट शी निगडित आहे
वरलोड वाहन तपासणी हे आरटीओ डिपार्टमेंटशी निगडित आहे, खूपच आवश्यकता लागली तर त्याच्यासाठी स्वतंत्र ट्राफिक डिपार्टमेंट आहे,

विनाकारण त्याच्यामध्ये तुम्ही ग्रामीण पोलिसांना विशेष करून मला त्याच्यात गुसवण्याचा प्रयत्न करू नका.

कोणत्या डिपार्टमेंटचे काय काम आहेत हे तुम्हाला अजून इतके वर्ष पत्रकारिता करूनही समजले नाही का.

का आम्हाला टार्गेट हे वेगळ्या उद्देशाने केले जात आहे का वेगळा काही उद्देश आहे.

सदरचे काम ज्या विभागाचे आहे ते महसूल विभाग आरटीओ विभाग हे आपल्या नजरेतून कसे काय सुटतात का त्याला वेगळी कारण आहे हे आम्ही सांगावे.

रात्री सदर मुरमाच्या ट्रकवर कारवाई करण्यासाठी कलेक्टर साहेबांनी आरटीओ विभागाचे अधिकारी बोलून घेतले होते, त्यांना त्यावर कारवाई करायला सांगितली ग्रामीण पोलिसांनी त्यावर कारवाई केली नाही, यावरून तुम्हाला कसे समजत नाही किते पोलीस डिपार्टमेंटचे काम नाही.

कोणताही वाळू चोरीचा हायवा दोन हजार रुपये दंड करून सोडण्याचा अधिकार पोलीस विभागाला नाही आणि तसे काही कागदोपत्रि झालेले ही नाही, अभ्यास कमी पडतोय तुमचा,

आमचेही म्हणणे
या कार्यवाहीचा पोलिस यंत्रणेचा संबंध नाही म्हणतात व पाण्यात उड्या मारल्याचा प्रसंग आठवण करण्याची आवश्यकता काय असे म्हणतात मग सांगा रेती काढणाऱ्या पकडण्यासाठी पाण्यात उड्या मारायचे नाटक करण्याची गरज काय ते ही काम तुमचे नाही ते महसूल कर्मचारीच करतील.

इतर विभागाचे नाव घेतले नाही म्हणता आणि त्यासाठी सम्यक ने हातमिळवणी केली म्हणता मग सांगा तुम्ही तुमचे नाव न घेण्यासाठी असेच हातमिळवणी करता का आम्ही हात मिळवणी केली असेल तर चौकशी आमची ही करा व इतर विभागाच्या अधिकाऱ्याची करा होऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी

या प्रकरणात आम्हाला गवसण्याचा प्रयत्न करू नका असे म्हणता, असे म्हणताय की धमकावताय हे कळू द्या

इतके वर्ष पत्रकारिता करतोय म्हणूनच कोण काय करत आहे हे उघड करण्याचा प्रयत्न आहे

– विजय निलंगेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल