रयत सेवाभावी संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कालवश अनुसयाबाई सूर्यकार यांना अभिवादन
नांदेड – दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी रयत सेवाभावी संस्थेच्या वतीने घटनेच्या शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व कालवश अनुसयाबाई रावसाहेब सूर्यकार यांना विनम्र अभिवादन करण्यात आलेली आहे.
सामाजिक न्यायाचा आधारस्तंभ असलेल्या महामानवाला अभिवादन करण्यात आले तसेच रयत सेवाभावी संस्थेच्या संस्थापक श्रीमती अनुसयाबाई रावसाहेब सूर्यकार यांचे आकस्मित निधन झाल्यामुळे त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अनुसयाबाई सूर्यकार या रयत सेवाभावी संस्था या सामाजिक संस्थेच्या संस्थापक म्हणून गेले बारा ते तेरा वर्ष काम केलेले आहे त्यांनी ग्रामीण विकास व महिला सक्षम करण्यासाठी आपला अमूल्य वेळ देऊन गोरगरीबांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणाऱ्या पैकी होत्या. अनुसयाबाई ह्या बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गाने जात शिक्षणाला अधिक महत्त्व देऊन त्यांच्या तिन्ही मुलांना शिक्षण घेऊन नोकरीला लावून स्वाभीमानाने संघर्ष केला मृत्यूसमयी आयुष्यभर कष्ठाची कामे करून नविन आयाम ठेवला. यांच्या प्रेरणादायी संघर्ष मय जीवनाचा अंत झाला त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आला.
यावेळी संस्थेचे जेष्ठ संचालक भीमराव टोमके,केशव मेटकर,बालाजी पाटोळे,अनिताबाई मेटकर, प्रा. इरवंत सुर्यकार , सपना टोमके, शेषराव गजभारे, जोंधळे ताई , प्रिती मेटकर, सुजताबाई ढवळे, कांबळेताई, बापुराव डोम्पल्ले, आदिजनांची उपस्थिती होती.











