महापालिकेच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नांदेड,०६ :- महापालिकेच्या वतीने आज दि.०६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पूर्णकृती पुतळ्यास मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदराजंली वाहिली.यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सुद्धा बाबासाहेबांना अभिवादन केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण म्हणजे एका प्रज्ञासूर्याचे महापरिनिर्वाण, ज्यांनी आपल्या अथांग ज्ञानसागराने आपल्या विध्दवतेने माणुसपण नाकारणारी समाज व्यवस्था बदलुन टाकली. समाजव्यवस्थेतील एक असा वर्ग ज्याचं समाजानं माणुस होणच स्वीकारले नाही, अशा समाजाला त्याच माणुसपण मिळवून दिलं, त्या केवळ वर्गाचाच नाही तर समस्त मानव जातीचा उद्धार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे, असे प्रतिपादन यावेळी मनपा आयुक्तांनी केले.
यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, अतिरिक्त्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपायुक्त अभिजित वायकोस, उपायुक्त स.अजितपालसिंग संधु, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, मुख्य उद्यान अधिक्षक डॉ.मिर्झा बेग, क्षेत्रिय अधिकारी गौतम कवडे, अग्निशमन अधिकारी श्री के.जी. दासरे, जनसंपर्क अधिकारी सुमेध बनसोडे, कॉ.गणेश शिंगे, साहेबराव ढगे, साहेबराव जोंधळे, धम्मपाल प्रधान, यांच्यासह शहरातील बोद्ध अनुयायी व मनपाचे कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











