Home / राज्य / दक्षिण उपविभागाचे अभियंता शिवराज नरमिटवार यांनी लक्ष न दिल्याने ३६ लाख रुपयांचे काम कोट्यावधी रुपयांच्या घरात

दक्षिण उपविभागाचे अभियंता शिवराज नरमिटवार यांनी लक्ष न दिल्याने ३६ लाख रुपयांचे काम कोट्यावधी रुपयांच्या घरात

दक्षिण उपविभागाचे अभियंता शिवराज नरमिटवार यांनी लक्ष न दिल्याने ३६ लाख रुपयांचे काम कोट्यावधी रुपयांच्या घरात

नांदेड – जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भावनांचे नूतनीकरणाचे चार महिने कालावधीचे काम जवळपास तीन वर्ष झाले तरीही अर्धवट आहे. दक्षिण उपविभागाचे अभियंता शिवराज नरमिटवार यांनी लक्ष न दिल्याने ३६ लाख रुपयांचे काम कोट्यावधी रुपयांच्या घरात गेल्याने नूतनीकरणाच्या कामाला नवीन पायंडा पडत असल्याचे बोलल्या जात आहे. याकडे कार्यकारी अभियंता रामकृष्ण गळधर यांनी लक्ष गरजेचे आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये विविध विभागाच्या बैठका व छोटेखानी कार्यक्रम घेण्यासाठी बचतभवनची इमारत वापरल्या जात होती. सदर इमारत जीर्ण व दुरावस्था झाल्याने १० मार्च २०२३ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी काढली होती. ही निविदा ३६ लाख ७ हजार ६५४ रुपयाला अंतिम करून कंत्राट देण्यात आले होते. बचतभवनांच्या नूतनीकरणाचे काम चार महिने या कालावधीत पूर्ण होण्याची अट असताना जवळपास ३२ महिन्याचा कालावधी लोटला तरीही अर्धवट अवस्थेत आहे. संबंधित उप अभियंता शिवराज नरमिटवार यांच्या देखरेखी खाली हे काम प्रचंड रखडले आहे. अर्ध्या कोटीचे काम कोटी रुपयांच्यावर खर्च करून देखील ही इमारत अद्याप पर्यंत वापरात येऊ शकली नाही.

निविदेच्या करारातील अटीप्रमाणे हे काम विमा संचालकाच्या निर्देशाप्रमाणे विमा पॉलिसीसह जिल्हा कामगार कार्यालयातील नोंदणीकृत कामगारांमार्फत व कामाची माहितीचा नोटीस बोर्ड लावून तात्काळ सुरू करणे बंधनकारक होते. परंतु संबंधित उपविभागीय अभियंता शिवराज नरमिटवार यांनी नूतनीकरणाचा नवीन पायंडा पाडत सदर काम प्रलंबित असल्याने कंत्राटदाराचा लाभ आणि शासनाला भुर्दंड असा प्रकार निर्माण झाला आहे. चार महिन्यांपूर्व याबाबीच्या चौकशीची मागणी करण्यात आली होती तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने कार्यकारी अभियंता रामकृष्ण गळधर या अनियमिततेला पाठीशी घालत आहेत काय अशी शंका निर्माण होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल