असदुल्लाबाद येथील मालमत्ता धारकाचे समस्या जिल्हाधिकारी सोडवणार
नांदेड दि. ४ ऑक्टोंबर –
शहरातील असदुल्लाबाद येथील मागील ७०-८० वर्षापासून इनामी जमिनीचा प्रश्न अतिशय गंभीर होत होता. त्या संदर्भात नांदेड उत्तरचे आ. बालाजीराव कल्याणकर यांनी हा विषयाची व्यवस्थित मांडणी करून येथील जवळपास ३५ हजार मालमत्ता धारकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यात त्यांना प्रत्येक टप्प्यात यश आले आहे. हा प्रश्न कायदेशीर सोडवून तो व्यवस्थित मार्गी लावण्यासाठी सतत प्रयत्न केल्यामुळे आज जिल्हाधिकारी नांदेड यांच्यासोबत बैठक घेऊन जवळपास जे जिल्हास्तरीय विषय आहेत ते जिल्हाधिकारी यांनीसोडवण्याचे मान्य त्यात केले.
नांदेड शहरातील पीरबुरान यथील जवळपास ६ हजार मालमत्ता धारकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आ. बालाजीराव कल्याणकर आणि जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत मोठी फलश्रुती मिळाली आहे.
भविष्यात या भागातील मालमत्ताधारकांना कोणताही नजरांना भरावा लागणार नाही. यापूर्वी येथील मालमत्ता धारक हे भयभीत होते ते आज आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्यामुळे भयमुक्त झाले आहेत. ७० ते ८० वर्षापासून बेकायदेशीर असलेल्या मालमत्ता धारकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच दिनांक १ डिसेंबर २०२१ च्या परिपत्रकानुसार नांदेड मधील इनामी जमिनीचे ग्रहकर्ज तारण कर्ज बंद होते. ते ही काही कायदेशीर बाबी तपासून सुरळीत करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिल्यामुळे भविष्यात या भागात बँक विविध प्रकारचे कर्जासाठी लागणारे तारण या ठिकाणची मालमत्ता इत्यादी ग्राह्य धरली जाणार आहे. तसेच या भागातील मालमत्ता धारकांना मानपाकडून व्यवस्थित बांधकाम परवाना देण्याचे सुद्धा आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले. नांदेड शहरात या भागात अनेक बहुमजली इमारती असून त्यात सदनिका धारक वास्तव्य करून राहतात त्यांना त्यांचा वैयक्तिकरित्या नजरांना भरून नियमाकुल करण्याचे धोरण तयार करून राज्यस्तरावर मान्यता घेण्याचे ठरले आहे. त्याचबरोबर मगनपुरा भागातील भाडेतत्त्वावरील मालमत्ता धारकांना दिलासा देण्यासाठी विशेष प्रस्ताव तयार करून महसूल विभागाकडून मान्यता घेण्याचे मान्य केल्यामुळे येथील प्रश्न पण निकाली निघणार आहे. बैठकीत आ. बालाजी कल्याणकर यांच्यासह जिल्हाधिकारी कर्डिले, अप्पर जिल्हाधिकारी गायकवाड आदी उपस्थित होते.











