स्थलांतर झालेले मतदार मनपा निवडणूक यादीतून काढून टाका – प्रकाश मारावार
नांदेड महानगरपालिकेच्या आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीत मनपा हद्दीतून स्थलांतर झालेले मतदार मतदान यादीतून नावे काढून टाकण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली.
नांदेड शहरातील एकूण 20 प्रभाग मध्ये स्थलांतरित व बाहेरगावी असलेल्या लोकांचे नावे मोठ्या प्रमाणे समाविष्ट करण्यात आले असून जे महानगरपालिका हद्दीत वास्तव्य करतात. ज्यांचे स्वतःचे घर आहे किंवा भाडेकरू पंधरा वर्षांनी ने राहतात अशा लोकांचा सर्वे महानगरपालिकेने करावे. महानगरपालिका हद्दीत स्थलांतर झालेले. मयत झालेले. दोन दोन ठिकाणी नावे असलेले. नावात घोळ असलेले असे अनेक मतदार महानगरपालिका मतदार यादीतून तात्काळ काढण्यात यावी. जेणेकरून नांदेडमध्ये वास्तव्यात असलेले मतदार निपक्षपणे मतदान करून योग्य नगरसेवकाला निवडून देतील दिशाहीन महानगरपालिकेला दिशा देतील. नांदेड महानगरपालिका हद्दीत जवळपास 50 ते 60 हजार स्थलांतरित झालेले. नांदेड मध्ये वास्तव्य नसताना त्यांचे नावे मतदार यादी टाकण्यात आलेले अशा सर्व लोकांचं नावे तात्काळ मतदार यादीतून काढून टाकण्याची मागणी शिवसेना महानगर उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या पक्षाच्या वतीने महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी एका निवेदनाद्वारे मनापासून आयुक्त तसेच नांदेड जिल्हाधिकारी. महाराष्ट्र मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याकडे केली. बोगस स्थलांतरित झालेले मतदारांची शोध मोहीम राबवून निव्वळ महानगरपालिका हद्दीत वास्तवात असलेले अशाच लोकांची मतदार यादीत समाविष्ट करण्यात यावी जेणेकरून येणारी महानगरपालिका निवडणूक वाद विरहित. निपक्षपातीने होईल. असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी व्यक्त केला.











