ओबीसी हक्क परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध
नांदेड- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण संपुष्टात आणल्यामुळे ओबीसी हक्क परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निषेधाचा ठराव बहुमताने सहमत करण्यात आला.
राज्य सरकारच्या ओबीसी विरोधी अन्यायकारक शासन निर्णयाच्या निषेधार्थ नांदेड जिल्ह्यातील २०० हून अधिक ओबीसी जाती एकत्र येऊन मोठा ओबीसी हक्क मेळावा संपन्न झाला . या ऐतिहासिक मेळाव्यात ओबीसी समाजाने आपली एकजूट दाखवून शासनाच्या अन्यायाविरुद्ध संघर्षाची भूमिका घेतली आहें.
मेळाव्यात सर्व वक्तानी सरकारच्या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या मनात अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली. निर्णयामुळे ओबीसी समाजाला काहीच मिळत नाही असे वक्त्यांनी सांगितले.
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आरक्षणवाद्यानी आरक्षणवाद्यांच मतदान केले जाईल असा निर्धार व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यात महायुती सरकारच्या कोणत्याही मंत्र्याला फिरु न देण्याचा निर्धार करण्यात आला.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचे ठरवण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यातून ५० हजारांच्या संख्येने मोर्चा काढण्यात येणार असून, नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर १० लाखांच्या सहभागाचा महामोर्चा काढण्या येणार आहे.
यावेळी ओबीसी, भटके विमुक्त, बलुतेदार समाजातील मोठ्या संख्येने बांधव उपस्थित होते. ही ओबीसी हक्क परिषद डॅा बी डी चव्हाण आणि ॲड अविनाश भोसीकर यांच्या नेतृत्वाखालील संपन्न झाली. या मेळाव्यात महेंद्र देमगुंडे, सचिन पाटील, एस जी माचनवार, शेषेराव चव्हाण, चंद्रसेन पाटील, नागनाथ घिसेवाड, बालाजीराव शिंदे, धिरज यादव, मावली गित्ते, संभाजी धुळगुंडे, रामचंद्र येईलवाड, नामदेव आयलवाड, गोविंदराम सुरनर, दत्ता चापलवाड, लक्ष्मण लिंगापुरे, दीपक मगर, गंगाधर भांगे, नामदेव राऊत, आप्पाराव राठोड, छत्रपती कानोडे, लक्ष्मणराव देवदे, राजेश सिंगनवाड, अंगद केंद्रे आदी प्रमुख उपस्थित होती.
ओबीसी नेत्यांनी एकात्मतेचा संदेश देत आरक्षण हक्कांच्या बचावासाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले. सर्व समाजघटकांनी संघटितपणे पुढाकार घेऊन शासनाच्या अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहण्याचे आवाहन ओबीसी, भटके विमुक्त, बलुतेदार नांदेड जिल्हा यांनी केलं.
– विजय निलंगेकर











