पालकमंत्री अतुल सावे सूड भावनेने वागतात – खा. रवींद्र चव्हाण
नांदेड- अतिवृष्टीमुळे शेत, पिक व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 5-6 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. पण राज्य शासनाकडून अद्याप मदत दिली जात नाही. राज्य शासन निर्दयी मनाचे आहे, असा घणाघाती आरोप खा. रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला.
पूरग्रस्त भागाची पाहणी करताना त्या भागाचे खासदार या नात्याने त्यांनी मलाही बोलावले पाहिजे परंतु ते सुद्अभआव्हाने वागत आहेत विरोधी पक्षाचा खासदर म्हणून सावत्र वागणूक ठेवत आहेत माझ्या गावात आल्यावर तरी मला सोबत घ्यायला पाहिजे पण पालकमंत्र्यांनी दूजाभाव करत बोलावले नाही आता मी न बोलावता कसे जाऊ असेही खा. रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत खंत व्यक्त केली. आतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 400-500 गावांना पाण्याचा वेढा पडला होता. शेकडो हेक्टर शेती खरडून गेली. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. 1983 नंतर झालेला सर्वात मोठा पाऊस होता. 2006 मध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आले होते. त्यांनी भेट देऊन शेतकरी, नागरिकांना दिलासा देत आर्थिक मदत दिली होती. अतिवृष्टी झाली, पूर ओसरला. त्यानंतर पालकमंत्री अतूल सावे आले. त्यांनी मोजक्याच गावांना भेटी दिल्या, अशी टीका केली.
राज्य शासनाने पंचनामे बाजुला ठेवून मदत करावी. गतवर्षीच्या अतिवृष्टीचे अनुदान अद्याप मिळाले नाही. ते त्वरित देण्यात यावे.नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, प्रत्येक घराला 25 हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली.
अतिवृष्टी बाधितांना मदत करताना राज्य शासनाची तत्परता दिसत नाही. राज्य सरकार अपयशी ठरले,असा आरोप केला.
श्रावस्तीनगर येथील नागरिकांना खाण्यासाठी अन्न नाही. महानगर पालिका उपाययोजना करण्यास असमर्थता ठरली. निवारा केंद्र नावालाच आहेत, त्या ठिकाणी सुविधा नाहीत, असेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेला नांदेड उत्तराचे अध्यक्ष राजेश पवाडे दक्षिण चे अध्यक्ष माजी आमदार हणमंतराव बेटमोगरेकर, महानगर अध्यक्ष अब्दुल सत्तार अनुसूचित जाती सेलचे शहराध्यक्ष सत्यपाल सावंत उपस्थित होते











