आज महाकवी वामनदादा कर्डक जयंती महोत्सवाचे अयोजन
;अनेक दिग्गज कलावंतांची हजेरी
नांदेड : गेली 19 वर्षापासून महाकवी वामनदादा कर्डक व प्रतापसिंग बोदडे यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्त आज दुपारी ठीक दोन वाजता डॉ. शंकरराव चव्हाण पेक्षा ग्रह येथे महाराष्ट् तिल अनेक दिग्गज कलावंत मंडळीच्या उपस्थितीत जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे कार्यक्रमाचे मुख्य संयोजक संजय निवडगे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे कळविले आहे.
गेली 19 वर्षापासून संजय निवडुंगे आयोजित वामनदादा कर्डक व प्रतापसिंग बोधडे यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आज दुपारी ठीक दोन वाजता शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक नागसेन दादा सावदेकर अजय देहाडे कुणाल वराळे अशोक निकाळजे प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र चंद्रकांत शिंदे व मी होणार सुपरस्टार फेम अंजली गडपाळे यांच्यासह महाराष्ट्रातील प्रशिध्द दिग्गज कलावंत मंडळीची ह्या कार्यक्रमात हजेरी लाभणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध विचारवंत प्रा.
डॉ. ऋषिकेश कांबळे उद्घाटक गौतम कदम व स्वागत अध्यक्ष म्हणून इंजि. प्रशांत इंगोले यांची प्रामुख्याने उपस्थिती असणारा आहे या कार्यक्रमात सामाजिक धार्मिक व शैक्षणिक व सांस्कृतीक क्षेत्रामध्ये आपले भरीव योगदान देणारे लोकांचा तुफानातील दिवे हा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला तमाम आंबेडकरी जनतेने व एक रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहण्याचे अहवान कार्यक्रमाचे मुख्य आयोजक संजय निवडगे रवींद्र सोनकांबळे निमंत्रक विजय दादा कांबळे प्राचार्य विकास कदम शुद्धोधन आदींनी केले आहे











