पालकमंत्री अतुल सावे यांचा तूघलकी कारभार
नांदेड – नांदेड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून पावसाने थैमान मानले असून जवळजवळ सात ते आठ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे तर दोन ते तीन अद्यापही बेपत्ता आहेत शेकडो घरे उद्ध्वस्त झाले असून हजारो कुटुंब बेघर झाले आहेत जनावरांची सुद्धा शेकडो संख्येमध्ये मृत्यू झाला असून पूरग्रस्त लोकांना जगावे कशासाठी असा मोठा प्रश्न समोर आला आहे घरात आहे नाही ते वाहून गेले केवळ पाणी वाढले म्हणून पळून जाण्यात ज्या कपड्यावर यशस्वी झाले तेच कपडे आज त्यांच्या अंगावर आहेत ज्या वयोमानानुसार म्हातारे असलेल्या लोकांना पळता आले नाही त्यांना मात्र मृत्युमुखी पडावे लागले एवढी गंभीर परिस्थिती असताना पालकमंत्री मात्र कुठे आहेत हे कुणालाच माहित नाही एका माहितीनुसार असे कळते की पालकमंत्री एका वृत्तपत्राच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रदेशात गेले आहेत नांदेडचे दिग्गज असलेले सर्वच नेते या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असल्याचे बोलल्या जात आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुकाच नव्हे तर हदगाव हिमायतनगर ही तालुके सुद्धा या पावसाच्या पाण्यात प्रभावी झाले असून लाखोयुक्त जमीन बरबाद झाली आहे तर हजारो घर झाले अशा परिस्थितीमध्ये पालकमंत्री मात्र प्रदेशात मजा करत आहेत असे बोलले जात आहे
आता मात्र पालकमंत्र्यांनी कहरच केला आहे लोकांच्या रोशास समोरी जावे लागते हे ठाऊक झाल्यानंतर त्यांनी मात्र उंटावरून शेळ्या राखण्याचा प्रयत्न केला आहे पूरग्रस्त लोकांना विविध साहित्य पाठवून एक प्रकारे या पूरग्रस्तावर उपकारच केले आहेत असेच म्हणावे लागेल.

मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या प्रभाव क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुक्रमाबाद, हसनाळ, रावणगाव, भिंगोली, भासवाडी या गावांमध्ये पालकमंत्री अतुल सावे यांनी पूर परिस्थितीची दखल घेऊन पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य उपलब्ध करून दिले आहे. हे साहित्य देगलूरचे उपविभागीय अधिकारी व मुखेडचे तहसीलदार यांना वितरणासाठी सुपूर्द केले असून, त्यांच्यावतीने पूरग्रस्तगावांमध्ये या साहित्याचे वितरण करण्यात येत आहे. या साहित्यात प्रामुख्याने दैनंदिन वापरातील कपडे साडी, टीशर्ट, ट्रॅकपँट, टॉवेल, आणि जीवनावश्यक औषधे पॅरासीटामॉल टेबलेट स्ट्रिप, ओआरएस इ. साहित्याचा यामध्ये समावेश आहे.
०००००











