गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर झालेली मारहाण प्रकरणी कर्मचाऱ्यात संतापाची लाट
नांदेड दि . 13 – वजीराबाद पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी कर्त्यावर असलेल्या गृह रक्षक दलाच्या कर्मचाऱ्यास मारहाण केल्याची घटना घडल्यानंतर यापूर्वीचे पोलीस निरीक्षक कदम यांच्या किस्से आता पुढे येऊ लागले आहेत परमेश्वर कदम यांनी यापूर्वी अनेक वेळा गृह रक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे बुटाणे मारेन असे शब्द वापरणे असे प्रकार अनेकदा घडल्याचे आता येथील कर्मचारी बोलून दाखवत आहेत

काही दिवसापूर्वी वजीराबाद येथील तिरंगा चौक येथे कर्तव्यावर असलेले गृह रक्षक दलाचे अर्थात होमगार्ड कर्मचारी हिंगोले हे शहर वाहतूक शाखेच्या अंतर्गत काम करत असताना कर्तव्यावर कुचराई केली म्हणून वजीराबाद पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक कदम यांनी हिंगोले यांना मारहाण केली मारहाण एवढी मोठी आहे की खाकी वर्दीवर असताना देखील त्यांच्या पाठीवर व उमटलेले दिसून येत आहेत वास्तवात हे कर्मचारी वाहतूक शाखेचे अंतर्गत असतानाही वजीराबाद पोलीस स्थानकाचा काही एक संबंध नसताना केवळ आकसापोटी परमेश्वर कदम यांनी मारहाण केल्याचे आता बोलले जात आहे यामागे जातीय देश भावनाही असल्याचे बोलल्या जात आहे यापूर्वी एका मुस्लिम कर्मचाऱ्यांस जूते से मारुंगा अशा शब्दात त्याचा पान उतारा केला असे बोलले जात आहे एवढेच नव्हे तर अनेक वेळा कर्तव्यावर असलेल्या गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना अश्लील भाषा बोलणे शिवीगाळ करणे हा प्रकार घडत आला आहे केवळ प्रोटोकॉल म्हणून आणि आपण तक्रार केली तरीही काही फरक पडणार नाही असे समजून आतापर्यंत झालेल्या प्रकार दबल्या गेला परंतु हिंगोले यांना केलेली मारहाण ही कर्त्यावर असताना झालेली आहे हा प्रकार पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या कानावर गेला असता त्यांनी या प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आता गृहरक्षक दलाच्या पीडित कर्मचाऱ्यांना न्यायाची आस दिसून येत असल्याने मागील प्रकार सांगण्यास काही कर्मचारी तयार असल्याचे बोलले जात आहे.
पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सदर प्रकारनाची चौकशी करण्यासाठी पोलीस उपाधीक्षक गुरव यांच्याकडे प्रकरण सोपविलेले आहे आता गृह रक्षक दलाच्या सर्वच कर्मचाऱ्यांचे लक्ष पोलीस उपअधीक्षक गुरव काय निर्णय घेतील याकडे लागले आहे
गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर झालेली मारहाण प्रकरणी कर्मचाऱ्यात संतापाची लाट पोलीस उपाधीक्षक गुरव यांच्या निर्णयाकडे लक्ष











