जातीयवादी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना वाचवण्याचा शेवटच्या प्रयत्नांनाही अपयश
नांदेड – परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान विटंबना प्रकरणी शहरात गोंधळ निर्माण होऊन दगडफेकीचे प्रकार झाला उपस्थित झालेला जमाव हाता बाहेर जाईल की काय ही शंका घेऊन पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला गल्लीबोळात घुसून आंबेडकर अनुयायांना मारहाण केली एवढेच नव्हे तर लोकांच्या उभे असलेल्या वाहने आणि घरांचे प्रवेशद्वारावर पोलिसांनीच लाठीमार करून तोडफोड केली याची व्हिडिओ ही मोठ्या प्रमाणात व्हायरस झाले यामध्येच सोमनाथ सूर्यवंशी नावाचा मुलगा जो पुण्याला शिक्षण घेत होता तो परभणी येथे कायदया ची परीक्षा देण्यासाठी आला होता आणि या पोलिसांनी त्याला घेरुन मारले आणि या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला याप्रकरणी आंबेडकर अनुयायांनी आणि सोमनाथ सूर्यवंशी ची आई यांनी कायद्याने न्याय मिळावा यासाठी आंदोलन केली आणि यांची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी पुढाकार घेतला आणि या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी सर्व तो प्रयत्न केला मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाणीत मृत्यू झाला असे नमूद करून मारहाण करणाऱ्या जवळपास 70 पोलिसावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले यामध्ये प्रमुख परभणी पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड हा होता. अशोक घोरबांड नांदेडमध्ये असतानाही बोंढार प्रकरणात उच्चवर्णी यांना मदत केली म्हणून त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले होते परंतु या प्रकरणातून तो कसाबसा निसटला नांदेडला असताना त्याच्या विरोधात तू कार्यरत असलेल्या पोलीस स्टेशन हद्दीत असलेले दोन फिर्यादी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अशोक घोरबांड विरोधात उपोषण धरली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी त्यांची मागणी होती परंतु या ठिकाणीही तो प्रशासनाला मॅनेज करण्यात यशस्वी ठरला आणि परभणी येथे स्थानिक गुन्हे शाखेचा प्रमुख म्हणून कार्यरत असताना त्याच्या हातून सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला अशी नोंद न्यायालयाने नोंदविली या जातीवादी ना वाचवण्यासाठी नांदेड येथील उच्चवर्णीय आमदार प्रयत्नात होते त्यासाठी आमदार हेमंत पाटील यांच्या शेतात माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता जातीवादी पोलीस निरीक्षक अशोक गोरबांडयाला आपली बाजू मांडण्यासाठी उप मुख्यमंत्री पुढे घेऊन जाण्याचे कार्य झाले यावेळी अशोक घोरबांड हा गुन्हेगार नाही त्याला गोवल्या जात आहे हे सांगण्यात यशस्वी झाले महाराष्ट्र राज्याच्या सर्वोच्च सभागृह म्हणजे विधान परिषदेमध्ये आमदार हेमंत पाटील यांनी परभणी प्रकरणात एक उदाहरण देऊन व हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाही पोलीस कसे निर्दोष आहेत किंवा त्यांना ज्यावेळी काम करायचे होते ते काम केले म्हणून त्यांना दोषी मानता का असा प्रश्न करून जातीवादी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांना वाचवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने अशोक गोरबानसह 70 पोलीस कर्मचाऱ्यांना या प्रकरणात आरोपी ठरविले आणि गुन्हा दाखल करा असा आदेश दिला परंतु परभणी पोलिसांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले आज उच्च न्यायालयात न्यायालयाने बाजू ऐकून घेऊन परभणी पोलिसांचा अर्ज फेटाळला आणि या पोलिसावरती गुन्हे दाखल करावे असे आदेश दिले यामुळे ज्या लोकांनी जातीवादी अशोक घोरबांड यांना वाचविण्याचा प्रयत्न केला त्यांचे प्रयत्न असफल ठरवून आता निश्चितच त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल.
या प्रकरणाकडे नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्याची पोलीस उप महानिरीक्षक शहाजि परभणी पोलिसांना काय निर्देश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











