Home / राजकारण / नांदेड शहर जिल्हाध्यक्षपदी पोकर्णा; नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष म्हणून होटाळकर यांची नियुक्ती

नांदेड शहर जिल्हाध्यक्षपदी पोकर्णा; नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष म्हणून होटाळकर यांची नियुक्ती

नांदेड शहर जिल्हाध्यक्षपदी पोकर्णा; नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष म्हणून होटाळकर यांची नियुक्ती

नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष म्हणून माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा तर नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या मिनलताई खतगावकर व सरचिटणीस म्हणून दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांची नियुक्ती पक्षाने केली असल्याची माहिती आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली आहे. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना चिखलीकर म्हणाले की, नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खांदेपालट करण्याचा निर्णय पक्षाने घेतला असून नांदेड शहराध्यक्ष म्हणून माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शहर कार्याध्यक्ष म्हणून माधवराव पावडे यांची निवड करण्यात आली आहे. नांदेड दक्षिणेचे जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर यांची पक्षाने नियुक्ती केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ शहर उपाध्यक्ष म्हणून माजी नगरसेवक साबेर चाऊस यांची निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ मिनल खतगावकर यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे. दक्षिणेचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी यांची पक्षाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती आमदार चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेच्या पुर्वी हदगाव व अर्धापूर तालुक्यातील भारतीय जनता पक्ष व प्रहार संघटनेच्या पदाधिकारी यांच्यासह अनेक पक्षातील तरुण कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या पत्रकार परिषदेला माजी आमदार तथा नवनिर्वाचित शहर जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे, माजी आमदार मोहन आण्णा हंबर्डे, प्रदेश उपाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर, प्रदेश सरचिटणीस प्रविण चिखलीकर, दिलीपराव धर्माधिकारी, वसंत सुगावे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष वैशाली चव्हाण, माजी सभापती स्वप्निल चव्हाण, मुक्तेश्वर धोंडगे, नांदेड उतरचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर, नेताजी भोसले, पप्पू जाधव, माजी नगरसेवक गफार खान यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल