Home / गुन्हा / सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हे दाखल करा

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हे दाखल करा

प्रतिनिधी-परभणीतील दंगल प्रकरणी अटकेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधीत पोलीसांवर गुन्हे दाखल करावेत असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने आज दिले आहेत. याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सूर्यवंशी कुटुंबियांच्यावतीने बाजू मांडत आहेत. त्यांच्या या लढ्याला मोठे यश मिळाल्याची चर्चा सुरु झाली आहे. राज्य सरकारने सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलीसांच्या मारहाणीत झाला नाही असा दावा केला होता. ऐन अधिवेशनाच्या काळात राज्य शासनाला ही एक मोठी चपराक मानली जात आहे.
परभणी शहरात एका माथेफेरुकडून १० डिसेंबर रोजी संविधानाची विटंबना करण्यात आली होती. याच्या निषेधार्थ परभणी शहरात ११ डिसेंबर रोजी संतप्त आंदोलन करण्यात आले. या आंदोलना दरम्यान दगडफेक, जाळपोळ झाली होती. याप्रकरणी पोलीसांनी मोठ्या प्रमाणात धरपकड केली होती. याप्रकरणी परभणी पोलीसांनी विधीशाखेत शिकणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीला अटक करुन न्यायालयासमोर हजर केले होते. न्यायालयाने सुरुवातीला सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुणावली होती.
पोलीसांनी ताब्यात असतांना सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला होता. या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांकडून सुरूवातीपासूनच केला जातोय. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलीसांच्या मारहाणीमुळे नव्हे तर श्वसनाच्या त्रासामुळे झाल्याचा दावा विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. न्यायालयीन कोठडीत असतांना परभणीच्या नवामोंढा पोलीस ठाण्यात सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण करण्यात आली होती असा आरोप सूर्यवंशी कुटुंबियांनी केला होता.
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात अॅड. प्रकाश आंबेडकरांनी न्यायालयात बाजू मांडली होती. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने ही याचिका दाखल केली होती. याबाबत अॅड. प्रकाश आंबेडकर हे सायंकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी, यासाठी आंबेडकरी चळवळीतील अनुयायांनी जानेवारी महिन्यात परभणी ते मुंबई असा लॉन्ग मार्च काढला होता. राहुल गांधी यांनीही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशींना हृदयविकाराचा झटका आला. दरम्यान त्यांना रुग्णालयामध्ये नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला. या प्रकरणात तीन पोलिसांचे यापूर्वीच निलंबन करण्यात आले. तर इतर संबंधीत पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल