नांदेड – राज्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी संस्थेद्वारा चालणारी अनुदानित वसतिगृहे शासनाच्या अधिपत्याखाली सुरू असतात. राज्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अशा वसंतिगृहाची संख्या सर्वाधिक आहे. वसतीगृह सुरू असताना संस्थाचालकांना विद्यार्थ्यांबाबत येणाऱ्या अडचणीसाठी जिल्हास्तरावर समाज कल्याण खात्यामध्ये व शासनाच्या विविध स्तरावर आपला प्रतिनिधी पाठवावा म्हणून राज्यभरात मागासवर्गीय अनुदानित वसतीगृह संचालक असोसिएशन कार्यरत आहे. या राज्याच्या कार्यकारणीच्या आदेशानुसार जिल्ह्याचे काम करण्यासाठी पन्नास वर्षापासून अधिक काळ काम करणारे जुने व नवीन संस्थाचालकाची बैठक शिवनगर, नांदेड या ठिकाणी आज संपन्न झाली. या बैठकीस सर्व संस्थांचालकांच्या वतीने नांदेड जिल्ह्यात काम करण्यासाठी सुशीलकुमार चव्हाण यांची सर्वांमध्ये बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी खालील कार्यकारणी जाहीर करण्यात आली. जिल्हाध्यक्ष सुशीलकुमार चव्हाण उपाध्यक्ष कैलाश देशमुख गोरठेकर, सुरेश जाधव, सचिव हरिदत्त हाके पाटील, कोषाध्यक्ष बालाजी मानकरी, मार्गदर्शक पंढरीनाथ केंद्रे, गणपत गवलवाड, पुंडलिक जाधव, सतीश चव्हाण, सदस्य पदी नितीन गायकवाड, चंद्रकांत करंदीकर, मारुती जाधव, भगवान सूर्यवंशी प्रकाश पवार, आदित्य देवडे विलास वाघमारे साईप्रकाश मेटकर आनंद झाडे अनिकेत राठोड शिवाजी सोनटक्के संदीप घोडाजकर, नितीन गायकवाड आदींची निवड करण्यात आली. यावेळी बहुसंख्यसंस्था चालक या बैठकीत उपस्थित होते.