नांदेड- अन्यायाच्या विरोधात तरुणांनी भीम प्रहार केला पाहिजे,असे प्रतिपादन भीम योद्धा श्याम निलंगेकर यांनी केले.
अनुसूचित जाती, जमाती कल्याणकारी संस्थाची राष्ट्रीय परिषद,दिल्ली यांच्या वतीने भीम प्रहारच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार, भीमयोद्धा श्याम निलंगेकर यांच्या अध्यक्षस्थानी कारण्यात आला.
नांदेडच्या शासकीय विश्राम गृहात झालेल्या सत्कार सभारंभात एस.बी.आयचे रामराव मुनेश्वर,रिपाईचे युवा नेते सूरज खिराडे,कोंडीबा भद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भीम प्रहारचे जिल्हाध्यक्ष दीपक पवळे,उपाध्यक्ष प्रकाश वाघमारे,सचिव सम्यक खोसले,शहर उपाध्यक्ष कैलास भोकरे,सचिव जयदीम पैठणे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रशिक ओढणे, चंद्रशेखर पाईकराव,सतीश कांबळे,लखन जोंधळे, ऋषिकेश निलंगेकर,सुर्वेश मुदिराज,अमित सूर्यवंशी, विजय वाटोरे,अजय जोंधळे, प्रीतम लोखंडे,भरत बंडेवार, बालाजी दाडेल,जय दवणे, नितेश दवणे,निखिल वाढणे, जयश वाघमारे,शिवम कार्ले,रुपेश भंडारे,विजय मंडले,वेदांत राजेंगोरे, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
सूत्रसंचालन रोहन कहाळेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कोंडीबा भद्रे यांनी केले.








