Home / पुरस्कार / डॉ. सुरेश सावंत यांच्यामुळे नांदेडच्या वैभवात भर- आ. बालाजी कल्याणकर

डॉ. सुरेश सावंत यांच्यामुळे नांदेडच्या वैभवात भर- आ. बालाजी कल्याणकर

नांदेड – भारतीय राष्ट्रीय साहित्य अकादमी कडून सर्वात्कृष्ट मराठी भाषा साहित्यातील पुरस्काराने बालसाहित्यातील योगदानाबद्दल नांदेड येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर केला आहे.
हा पुरस्कार भारतातील साहित्य क्षेत्रातील एक प्रतिष्ठित पुरस्कार आहे भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्यिक कृतीसाठी हा पुरस्कार दिला जातो डॉ. सुरेश सावंत यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे नांदेड उत्तरचे आ. बालाजीराव कल्याणकर यांनी डॉ. सुरेश सावंत यांच्या निवासस्थानी जाऊन डॉ.सुरेश सावंत व त्यांच्या सौभाग्यवती प्रा.मथुताई सावंत यांचे अभिनंदन केले.
डॉ. सुरेश सावंत यांच्या कार्यामुळे त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे नांदेडच्या वैभवात भर पडली आहे असे गौरवोद्गार काढत नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी डॉ. सुरेश सावंत यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सन्मान करताना भावना व्यक्त केल्या.
यामध्ये कादंबरी कविता लघुकथा नाटक साहित्यिक समीक्षा निबंध इत्यादी साहित्य प्रकारांचा समावेश होतो लेखक किंवा साहित्यिक यांनी भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचित नमूद केलेल्या २४ भाषांपैकी उदाहरणात सिंधी,मराठी,बंगाली, तामिळ,तेलगू तरी कोणत्याही भाषेत उल्लेखनीय साहित्यिक योगदान दिले आहे त्यांना हा पुरस्कार मिळतो.
२०२५ या वर्षीचा मराठी भाषा साहित्य अकादमीच्या पुरस्काराने नांदेडला सन्मानित केले आहे नांदेड येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सुरेश सावंत यांच्या “आभाळमाया” या बाल साहित्य कृतीला भारतीय साहित्य अकादमीने सन्मानित केले आहे.
नांदेडला डॉ. सुरेश सावंत यांना मिळालेल्या या मराठी साहित्यातील सर्वोच्च बहुमानामुळे नांदेडच्या वैभवात भर पडली आहे डॉ. सुरेश सावंत हे एक तपस्वी व्यक्तिमत्व असून त्यांनी आजवर शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात अनमोल असे कार्य केलेले आहे याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.
डॉ. सुरेश सावंत कर्मभूमी नांदेड असुन त्यांचे निवासस्थान माझ्या नांदेड उत्तर मतदार संघात असल्याचा मला अभिमान वाटतो असे आ. बालाजीराव कल्याणकर बोलतांना म्हणाले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाधरजी बडूरे, सौ.अपर्णाताई नेरलकर महिला जिल्हाप्रमुख, ऋषिकेश नेरलकर, श्याम पाटील कोकाटे शहरप्रमुख उमेश दिघे, मुन्ना राठोर, गणेश अप्पा हालकोडे यांच्यासह आदि पदधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल