हनुमान मंदिर मंगल कार्यालयातील बैठकीत सकल मराठा समाजाचा निर्णय
नांदेड – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चलो मुंबई’ची हाक देणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून २९ जून रोजी अंतरवाली सराटी येथे राज्यस्तरीय नियोजन बैठकीचे आयोजन केले आहे, या बैठकीला नांदेड येथून हजारो मराठे जाणार असल्याचा दृढ निश्चय शुक्रवारी (दि. २७) येथे झालेल्या बैठकीत सकल मराठा समाजाकडून करण्यात आला आहे.
जरांगे पाटील यांनी ‘चलो मुंबई’ची हाक दिली असुन येत्या २९ ऑगस्ट रोजी पुन्हा करोडो मराठे खालील मागण्यासाठी मुंबई जाण्यासाठी प्रचंड ताकतीने तयारीला लागले आहेत.
त्या तयारीसाठी राज्यभरातील गावागावात तालुक्यात आणि जिल्ह्यात सुद्धा बैठका जोरात चालु झाल्या आहेत. त्यात सुद्धा जरांगे पाटील यांनी एक राज्यस्तरीय निर्णायक बैठक २९ जुन रोजी अंतरवाली सराटी येथे बोलावली असुन त्याच अनुषंगाने, सकल मराठा समाज नांदेडच्या वतीने आज नांदेड शहरातील हनुमान मंदिर मंगल कार्यालय येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीला नांदेडवरून हजारो समाज बांधव जाण्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी मुदखेड, कंधार, लोहा, नायगाव, बिलोली, हदगांव, उमरी, भोकर यासह नांदेड दक्षिण व उत्तर तालुक्यातील मराठा सेवक बैठकीला उपस्थित होते.
– विजय निलंगेकर