Home / शैक्षणिक / स्वारातीम विद्यापीठाकडून अनुसूचित जाती ,जमातीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक दारे बंद

स्वारातीम विद्यापीठाकडून अनुसूचित जाती ,जमातीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक दारे बंद

नांदेड – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या पेट २०२४ चा निकाल सार्वजनिक सार्वजनिक न लावता व्यक्तिगत ई-मेल आयडीवर निकाल जाहीर केला आहे. तसेच पीएच.डी.प्रवेशातील जागा वाटपात आरक्षण प्रणालीचा वापर न करता मार्जितल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक दारे बंद करण्याचा प्रकार विद्यापीठ प्रशासनाकडून चालू आहे.
पेट २०२४ च्या प्रवेश परीक्षेत व निकाल प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यात यावी तसेच यासंदर्भात नसोसवायएफ संघटनेने वारंवार निवेदने देऊनही विद्यापीठ प्रशासनाने कुठल्याही दखल न घेता नुकताच पेट २०२४ चा निकाल जाहीर केला. मात्र तो सार्वजनिक न विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत ई-मेल आयडीवर लावलेला आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने व्यक्तिगत स्वार्थापोटी हा निकाल जाहीर जाहीर केला नसून त्या निकालामध्ये गोंधळ झाल्याच्या अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी दिल्या आहेत .त्यासंदर्भातही अद्याप पर्यंतही कोणतीच कार्यवाही केली नाही. ना विद्यार्थी संघटनेला कळवले. तसेच पेट प्रवेश परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही व्यक्तिगत ईमेल आयडीवर टाकले आहेत. तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र जाहीर केले नाही. त्याच पद्धतीने १७ जून २०२५ पासून सुरू झालेल्या RAC व इंटरव्यूमध्ये पीएच.डी. जागेसंदर्भात कुठल्याही आरक्षण धोरणाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने सरळ सरळ दलित, आदिवासी व ओबीसी विद्यार्थ्यांची कुचुंबना करून त्याची शैक्षणिक दारे बंद करण्याचा मनसुबा विद्यापीठ प्रशासन राबवत आहे. त्यामुळे पेट २०२४ च्या पीएच.डी.प्रवेशातील जागा वाटपात विद्यापीठ प्रशासन जाणून बुजून दलित, आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय करती असून त्यांच्या संवैधानिक अधिकारावरही गदा आणण्याचे काम विद्यापीठ प्रशासन करीत असल्याने

चालू असणाऱ्या RAC रद्द करण्यात याव्या व आरक्षण प्रणालीचा वापर करून RAC घेण्याची मागणी
नसोसवायएफ विद्यार्थी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.हर्षवर्धन दवणे यांनी कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच येत्या दोन दिवसात सकारात्मक निर्णय न घेतल्यास संघटनेला आंदोलनाची भूमिका घ्यावा लागेल तसेच यासंदर्भातील तक्रार महामहिम राज्यपाल , अनुसूचित जाती जमाती आयोग, विद्यापीठ अनुदान आयोग यांच्याकडे करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.या निवेदनावर डॉ.हर्षवर्धन दवणे,प्रा.सतीश वागरे, मनोहर सोनकांबळे, तेजस्विनी कांबळे अमोल कानिंदे विशाल कंधारकर, आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

– विजय निलंगेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल