मराठवाडा विभागामध्ये परभणी जिल्हा आंबेडकर विचारांना खांद्यावर घेऊन फिरणारा असा जिल्हा म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रात कुठेही काही घडले तर परभणी मधील आंबेडकरवादी रस्त्यावर उतरून आंदोलनाची भाषा करतात.
काही महिन्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तकाचे विटंबना केल्याप्रकरणी परभणी जिल्हा ढवळून निघाला या प्रकरणात आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांनी पुढाकार घेऊन आंदोलन छेडले यामध्येच सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस मारहाणी मध्ये मृत्यू झाला या प्रकरणास लावून धरत असतानाच विजय वाकोडे यांना हृदयविकाराचा धक्का लागून त्यांना मरण प्राप्त झाले या प्रकरणात न्याय मिळत नसल्याचे दिसून येत नसताना विजय वाकोडे यांचे सुपुत्र आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली परभणी ते मुंबई लॉंग मार्च करण्यात आला आणि न्याय हक्कासाठी लढाई दिली.
या प्रकरणात वंचित बहुजन आघाडी कुठेतरी मागे दिसत असल्याने आघाडीचे प्रमुख ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांनी मयत सोमनाथ सूर्यवंशी यांची न्याईक बाजू धरून न्याय देण्याचा प्रयत्न चालू आहे याच प्रकरणात सुजाता आंबेडकर यांनी एक सभा घेऊन या सभेमध्ये आशिष वाकोडे यांच्यावर नाव न घेता अनेक आरोप केले आणि यांना समाज माफ करणार नाही असे वक्तव्य केल्याने आशिष वाकोडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची मने दुखावली गेली याचाच पुढील अध्याय म्हणून आता वंचित बहुजन आघाडीला येणाऱ्या स्थानिक संस्था निवडणुकीत छेद करण्यासाठी रणनीती आखण्यात येत आहे मुस्लिम आणि बौद्ध समाज एकत्रित आणून मतांचे जुळवाजुळ करून परभणी महानगरपालिकेत नगरसेवक निवडून आणता येतील का याची चाचणी आशिष वाकडे यांनी माजी खासदार व एम आय एम चे नेते इम्तियाज जलील यांच्याशी भेट घेऊन सुरू केली आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम आणि बौद्ध या दोन्ही समाजांना एकत्रित करून निवडणूक लढवणार असल्याचे प्राथमिक बोलणे झाल्याचे आशिष वाकोडे यांनी बोलून दाखवली आहे तसेच इम्तियाज जलील यांनीही फेसबुक वरून पोस्ट करून बोलून दाखविले आहे.
नुकतेच इम्तियाज जलील यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट खाली गुन्हा दाखल झाल्याने या निवडणुकीला अधिकच महत्त्व प्राप्त होईल अशी राजकीय विश्लेषकांकडून चर्चा आहे
लवकरच खासदार इम्तियाजलीन परभणी येथे येऊन पुढील आखणी करणार असल्याचेही कळते असे झाले तर नगरसेवक पदावर काही कार्यकर्ते निवडून येतील की नाही हा जरी प्रश्न भविष्यावर सोडला तरी वंचित बहुजन आघाडीला मात्र त्रासदायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे आजपर्यंतच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी असो की भारिप बहुजन महासंघ यांच्याकडून आम्ही निवडून येत नसलो तरी आम्ही तुम्हाला पाडू ही रणनीती वापरून निवडणूक लढवल्या गेली हीच रणनीती आशिष वाकोडे आणि इम्तियाज जलील यांच्याकडून वापरण्यात येईल असेही विश्लेषकांचे मत आहे.
– विजय निलंगेकर