नांदेड, दि. 17 जून : नांदेड येथे कृषि विभागामार्फत राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत अनु.जाती व अनु.जमाती संवर्गाच्या शेतकऱ्यांसाठी तालुकास्तरावर 15 ते 30 जून 2025 या पंधरवाड्यात विशेष मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेंतर्गत लाभ देण्यात येणाऱ्या ठीबक व तुषार सिंचनाबाबत तालुका, मंडळस्तरावर व तसेच गावोगावी माहिती देण्यात येणार आहे.
नांदेड जिल्ह्यास अनु. जाती व अनु. जमाती संवर्गातील शेतकऱ्यांसाठी लक्षांक उपलब्ध असून लक्षांकापेक्षा कमी अर्ज प्राप्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनु. जाती व अनु. जमातीच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डी. आर. कळसाईत यांनी केले आहे.