Home / राज्य / प्रथमच आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीस शुभारंभ वारकऱ्यांचे उत्साहात स्वागत

प्रथमच आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीस शुभारंभ वारकऱ्यांचे उत्साहात स्वागत

नांदेड – सांगवी गावातून प्रथमच आळंदी ते पंढरपूर पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले असून, या ऐतिहासिक दिंडीस शनिवारी भाविकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत सुरुवात झाली. *शिवालय उद्योग समूहाच्या अध्यक्षा सौ. संध्याताई बालाजीराव कल्याणकर* यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हनुमान मंदिर समितीच्या सहकार्याने ही दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.
या कार्यक्रमाला भागवताचार्य संतोष पुरी महाराज, सांगवी प्रभागाच्या माजी नगरसेविका करुणाताई कोकाटे,गुरुवर्य गणेश गिरी महाराज, शिवसेना शहर प्रमुख श्याम पाटील कोकाटे, तालुका उपप्रमुख सत्यवान पाटील अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

हनुमान मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंडितराव कोकाटे, उपाध्यक्ष देविदासराव पवार, आनंदराव कोकाटे, माधवराव कोकाटे, चंद्रकांत कोकाटे, रामजी पवार, शिवाजी कोकाटे, गंगाधर कोकाटे, दिगंबर पवार, गजानन कोकाटे, सतीश कोकाटे, सचिन कोकाटे, पिंटू पवार, अविनाश कुटे, विशाल पांढरे, गजानन कोकाटे, अक्षय कोकाटे, अविनाश कोकाटे, रुपेश कोकाटे, श्रीशांत कपाटे, ज्ञानेश्वर राजेगोरे, आदित्य महले, गोलू कोकाटे आदी या वेळी उपस्थित होते.
कार्यक्रमात श्याम पाटील कोकाटे यांनी दिंडी चालक प्रेम महाराज ठाकूर व दिंडीत सहभागी सर्व वारकऱ्यांचे हार घालून स्वागत केले व त्यांना पुढील पंढरपूरच्या पायी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. या दिंडीमुळे सांगवी गावात आध्यात्मिक उर्जा निर्माण झाली असून, भाविकांमध्ये भक्तीभाव आणि उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल