उत्तर रेल्वे ने गाडी क्रमांक 14622/14621 फिरोजपूर कॅन्ट जंक्शन – हजूर साहिब नांदेड – फिरोजपूर कॅन्ट जंक्शन नवीन साप्ताहिक एक्सप्रेस सुरु करण्याचे घोषित केले आहे.
गाडी संख्या 14622 फिरोजपूर कॅन्ट जंक्शन – हजूर साहिब नांदेड साठी हि गाडी फिरोजपूर कॅन्ट जंक्शन येथून दिनांक 13 जून 2025 रोजी शुक्रवार पासून दुपारी 13.25 वाजता सुटेल आणि फरीदकोट, कोट कपुरा जंक्शन, भटिंडा जंक्शन, मानसा, जाखल, धमतन साहिब, जिंद, रोहतक, बहादुरगड, शकूरबस्ती, दिल्ली-सफदरजंग, फरीदाबाद, मथुरा जं.,आग्रा कँट, ग्वाल्हेर,विरांगना लक्ष्मीबाई झाशी, बिना जं., विदिशा, भोपाळ, इटारसी जं., खांडवा, भुसावळ जं.,मनमाड जं., औरंगाबाद, जालना, सेलू, परभणी जं., पूर्णा जं. मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे रविवार सकाळी 03:30 वाजता पोहोचेल.
गाडी संख्या 14621 हजूर साहिब नांदेड – फिरोजपूर कॅन्ट जंक्शन ही गाडी हुजूर साहिब नांदेड येथून दिनांक 15 जून 2025 रोजी रविवार पासून सकाळी 11.50 वाजता सुटेल आणि पूर्णा जं., परभणी जं., सेलू, जालना, औरंगाबाद, मनमाड जं., भुसावळ जं., खांडवा, इटारसी जं., भोपाळ, विदिशा, बिना जं., विरांगना लक्ष्मीबाई झाशी, ग्वाल्हेर, आग्रा कँट, मथुरा जं., फरीदाबाद, दिल्ली-सफदर जंग, शकूरबस्ती, बहादुरगड, रोहतक, धमतन साहिब, जिंद, जाखल, मानसा, भटिंडा जंक्शन, कोट कपुरा जंक्शन, फरीदकोट, मार्गे फिरोजपूर कॅन्ट जंक्शन येथे मंगळवार सकाळी 04:30 वाजता पोहोचेल.
या साप्ताहिक गाडीत द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, तृतीय श्रेणी वातानाकुलीत, द्वितीय शय्या आणि जनरल असे 22 डब्बे असतील.असे दक्षिण मध्य रेल्वे ने कळविले आहे.