Home / शैक्षणिक / इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा

नांदेड दि. 9 जून :- वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. अंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील लोकांसाठी योजना राबविल्या जात आहेत.
तसेच महाराष्ट्र शासनाने वडार समाजासाठी पैलवान कै.मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) व रामोशी समाजासाठी उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) या दोन महामंडळाची स्थापना केलेली आहे. ही महामंडळे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या. अंतर्गत कार्यरत असुन त्यांना स्वतंत्र उददीष्ट देण्यात आलेले आहे. या तिन्ही महामंडळां अंतर्गत पुढीलप्रमाणे योजना राबलिल्या जातात.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना – या योजनेची मर्यादा 10 लाख रुपयांपर्यत असुन अर्जदार हा विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा. अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष दरम्यान असावे, अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. ही योजना ऑनलाईन असुन यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा संबंधीत व्यवसायाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल व इतर कागदपत्रे वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजना – या योजनेची मर्यादा 10 लाख ते 50 लाख रुपयांपर्यत असुन या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत गट असावा व गटातील सदस्य हे विमुक्त जाती , भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावे. गटातील सदस्यांचे वय 18 ते 45 वर्ष पर्यत असावे. गटातील लाभार्थ्याचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. उत्पन्नाची मर्यादा नॉन क्रिमीनल साठी 8 लाखाच्या मर्यादीत असावी. ही योजना ऑनलाईन असुन यासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा संबंधीत व्यवसायाचे कोटेशन व प्रकल्प अहवाल वेबसाईटवर मुळ कागदत्रासह अपलोड करणे आवश्यक आहे.

1 लाख रुपये थेट कर्ज योजना – या योजनेमध्ये महामंडळाकडुन 1 लाख रुपये थेट कर्ज दिले जाते. या योजनेसाठी दोन जामीनदार व गहाणखत तसेच बोझा नोंद करुन देणे आवश्यक आहे. या योजनेसाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (1 लाख रुपयांपर्यत),रेशन कार्ड ,आधार कार्ड, वयाचा पुरावा, व्यवसायाचा परवाना इ. कागदपत्रांसह संबंधीत व्यवसायानुसार कागदपत्रे आवश्यक आहे. या योजनेचे अर्ज महामंडळाच्या कार्यालयातुन जातीचा मुळ दाखला व आधार कार्ड दाखवुन रितसर नोंद करुन अर्जदारास मिळतील.

बीज भांडवल योजना – ही योजना बँकेमार्फत राबविली जात असुन अर्जदाराने महामंडळाकडे जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (1 लाखापर्यंत) ,रेशनकार्ड ,आधार कार्ड, वयाचा पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र ,संबंधीत व्यवसायानुसार आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडुन कार्यालयात दाखल करावी लागतील . यापुर्वी लाभार्थीने कर्जाचा लाभ घेतला असल्यास त्यांना परत कर्ज प्रस्ताव दाखल करता येणार नाही.

वरील योजनेचे सन 2025-2026 या आर्थिक वर्षाकरीता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचे – 150,05,01, गट कर्ज व्याज परतावा योजना योजनेचे 01,01,01, बीज भांडवल कर्ज योजना – 01,01,01 , रुपये 1 लाख थेट कर्ज योजना – 200,20,20 असे उदिष्ट प्राप्त झाले आहे. जिल्हयातील इच्छुक लाभार्थीनी अर्ज करण्यासाठी महामंडळाच्या www.vjnt.in या संकेतस्थळाला भेट द्यावी अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक वि.जा.भ.ज. विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन नांदेड. फोन क्र.02462-220244 येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर.एस.नरवडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल