Home / देश / स्वाधार योजना : नवीन व नुतनीकरणाचे अर्जाबाबत सूचना

स्वाधार योजना : नवीन व नुतनीकरणाचे अर्जाबाबत सूचना

नांदेड :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील जे विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असून प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबधीत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी 13 जुन 2018 व 26 डिसेंबर 2024 च्या शासन निर्णयान्वये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नवीन व नुतनीकरण ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांचे नुतनीकरण अर्ज ऑनलाईन पध्दतीने तपासणी सुरु आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज अपूर्ण कागदपत्राअभावी त्रुटीत आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे माहिती देण्यात येत असून, अर्ज त्रुटीत आलेल्या विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर तात्काळ माहिती व्यवस्थीत भरावी जेणेकरुन या वर्षीचा लाभ देणे सोयीचे होईल.
नांदेड जिल्ह्यातील सर्व स्वाधार योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुठल्याही त्रयस्थ व्यक्तीशी संपर्क न साधता व कुठल्याही अमिषाला बळी न पडता प्रत्यक्ष संबंधीत कार्यालयातील स्वाधार विभागाशी संपर्क साधावा. तसेच या योजनेबाबत काही अडचणी असल्यास कार्यालयातील जबाबदार व्यक्तीकडे संपर्क करावा व माहिती घ्यावी. ही योजना थेट विद्यार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम वितरीत केली जाते. यामुळे आपण या बाबतीत जागृत राहून कार्यालयाबाहेर कुठल्याही यंत्रणेस संपर्क साधु नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

– विजय निलंगेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल