महाराष्ट्र राज्य पोलीस दल यांच्यातर्फे मुंबई येथे पहिली अखिल भारतीय पोलीस बॅडमिंटन स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून यासाठी देशभरातून निवड चाचणीची आयोजन करण्यात आले होते क्लस्टर 2024 25 यामध्ये केरळ या ठिकाणी स्पर्धेसाठी निवड चाचणी आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेसाठी नांदेड येथून मुख्यालयात कार्यरत असलेले मिलिंद लोणे आणि वाहतूक शाखेत असलेल्या सुषमा लोखंडे यांनी निवड चाचणीत यश मिळवले असून त्यांचे अभिनंदन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी केले आहे
मुख्यालय येथे कार्यरत असलेले मिलिंद लोणे यांनी एकेरी टेबल टेनिस या स्पर्धेत आणि महिला स्पर्धेत सुषमा लोखंडे मिक्स दुहेरी टेबल टेनिस या प्रकारात निवड झाली आहे
ही निवड स्पर्धा एप्रिल महिन्यामध्ये केरळ राज्यातील कोची या शहरात राजीव गांधी स्टेडियम मध्ये घेण्यात आली होती या स्पर्धेमध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद माणिकराव लोने यांनी एकेरी टेबल टेनिस स्पर्धेत कांस्य पदक पटकावले तर महिला पोलीस आमदार सुषमा लक्ष्मीकांत लोखंडे यांनी मिक्स टेबल टेनिस स्पर्धेमध्ये कांस्य पदक पटकावून नांदेड पोलीस दलाचे नावलौकिक वाढविले आहे या त्यांच्या निवडीबद्दल नांदेड पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक भोकर खंडेराव धरणे व पोलीस उपाधीक्षक गृह श्रीमती डॉक्टर अश्विनी जगताप यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत