नांदेड : आगामी काळात मी भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन निवडून येईल असे भाकीत करून राजकीय स्टंटबाजी करणाऱ्या भाजपा महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी मी भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर खा. अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये जातील का ? याची भविष्यवाणी ही लगेच सांगावी असे खोचक आव्हान आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपले नेते आहेत असे विधान आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी एका कार्यक्रमात केले होते . या विधानावरूनच माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी आ. प्रतापराव पाटील चिखलीकर हे अनेक राजकीय पक्षात फिरून आले आहेत. जवळजवळ सर्वच राष्ट्रीय पक्षातून त्यांचा प्रवास झालेला आहे. ते भारतीय जनता पार्टीत पाच वर्षे होते. यातूनच त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची नेतृत्वाबद्दल आस्था निर्माण झालेली आहे . त्यामुळे भविष्यकाळात ते भारतीय जनता पार्टीत येतील आणि लोहा कंधार विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला सुटून ते पुन्हा आमदार म्हणून निवडून येतील . शिवाय त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी ही त्यांच्यासोबत भाजपात येतील असे भाकीत केले आहे . अमरनाथ राजूरकर यांच्या भाकिताचा आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. राजुरकर यांना अनेक भाकीत समजतात मात्र खा. अशोक चव्हाण यांच्या बद्दलचे त्यांना कधीही भाकीत का करता आले नाही. अमरनाथ राजूरकर सारखा जाणता आणि भविष्याचा तंतोनात वेध घेणारा भविष्यकार सोबत असतानाही खा. अशोक चव्हाण यांची राजकीय वाहतात का झाली ? या परिस्थितीचे भाकीत त्यांना का सांगता आले नाही ? असा सवाल उपस्थित करत ते म्हणाले की , मी भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर खा. अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये जाणार का याबाबतही त्यांनी भविष्यवाणी करावी अशी सूचनाही आ. चिखलीकर यांनी दिली आहे.
– विजय निलंगेकर