Home / देश / नांदेड शहरात मध्यवस्तीत असलेल्या तरोडेकर मार्केट मधील स्पा सेंटरवरपोलिसांची धाड

नांदेड शहरात मध्यवस्तीत असलेल्या तरोडेकर मार्केट मधील स्पा सेंटरवरपोलिसांची धाड

नांदेड शहरातील वजीराबाद भागात असलेल्या तरोडेकर मार्केट येथे एका स्पा सेंटरवर पोलिसांनी धाड टाकून चार मुलीसह चार व्यक्तींनाही अटक केली आहे
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे बीओटी तत्त्वावर बांधकाम करण्यात आलेल्या या इमारतीमध्ये जवळजवळ 100 ते 200 दुकाने असून जवळपास 80% दुकाने बंद अवस्थेत आहेत याच गोष्टीचा फायदा घेऊन या ठिकाणी स्पा सेंटर उघडण्यात आले या स्पा सेंटरचे पाच ते सहा रूम्स असून या ठिकाणी दररोज शेकडो लोक मसाज करण्यासाठी येत असतात या ठिकाणी मसाज करणाऱ्या मुली आहेत त्या आसाम, पश्चिम बंगाल येथील असल्याची माहिती मिळत आहे नांदेड पोलिसांना या स्पा सेंटरवर अवैध धंदे चालत असल्याचे शंका आल्याने आज दुपारी चारच्या सुमारास धाड टाकली यावेळी या ठिकाणी पाच ते सहा व्यक्ती आणि चार मुली आढळून आल्या यावरून या चार मुलींना आणि चार व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलीस सूत्राकडून कळत आहे नव्यानेच बांधकाम करण्यात आलेल्या या इमारतीमध्ये गाळे जरी विकत घेतलेले असले तरी या ठिकाणी दुकाने चालू नसल्याने अत्यंत बिकट अवस्थेत या ठिकाणी हे मार्केट आहे गलिच्छ, दुर्गंध युक्त आणि अस्ताव्यस्त पडलेले सामान या ठिकाणी असल्याने या ठिकाणी हे मार्केट अडगळीत असल्याचे दिसून येतात आहे याचाच फायदा घेऊन या ठिकाणी अवैध धंदे होत असतील अशी शंका पोलिसांना वाटून येत आहे

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल