नांदेड जिल्ह्यातून विविध पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी झालेल्या मोटरसायकल शोधण्यात भाग्यनगर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना यश प्राप्त झाले आहे
नांदेड जिल्ह्यातच दोन चाकी वाहने चोरीचे प्रमाण वाढले असून ही वाहने जप्त करण्याची मोहीम पोलीस अधीक्षक अविनाश कुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड शहर सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात येत असून भाग्यनगर पोलीस ठाणे अंतर्गत संशयित व्यक्तीला विचारपूस केली असता त्याच्या जवळील वाहन चोरीचे निष्पन्न झाले यावरून त्यास ताब्यात घेऊन अधिकची चौकशी केली असता त्यांच्याकडून 26 वाहने सापडली या वाहनांची किंमत एकूण 18 लाख 20 हजार अशी दाखवली जात आहे नांदेड शहरातच नव्हे तर हिंगोली जिल्ह्यातील एक आरोपी जो की कळमनुरी तालुक्यातील चुंचा या ठिकाणचा असून मंगेश संजय लोमटे, माधव शंकरराव राजेगोरे अर्धापूर तालुक्यात असून संतोष सुधाकर वंगले तळेगाव तालुका उमरी बालाजी शंकरराव राजेगोरे अर्धापूर तालुका आणि आत्माराम उर्फ भैय्या बालाजी कदम हा सुद्धा अर्धापूर येथील असून या पाच जणांनी मिळून वाहने चोरीचा उद्योग चालवीला होता यामध्ये एक मेकॅनिक असून हा मेकॅनिक चोरीस आलेली वाहने त्याचे स्पेअर बदलून नंबर प्लेट बदलून वाहने विकण्याचा धंदा चालू केला होता सापडलेली पंचवीस वाहनेही हिरो कंपनीच्या स्प्लेंडर प्लस या मॉडेलची असून एक मात्र स्कुटी आहे ही सर्व वाहने विविध ठिकाणाहून जप्त करण्यात आली आहेत ही कामगिरी भाग्यनगर पोलीस तालुक्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे गुन्हा शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नरेश के वाढेवाले पोलीस कॉन्स्टेबल गजानन किडे, पठाण तसेच सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक मारुती चव्हाण, राजेंद्र सिटीकर, दीपक ओढणे व इतवारा विभागाचे अर्जुन मुंडे या सर्वांनी मिळून ही कामगिरी पूर्ण केली आहे.
ही वाहने सापडल्यानंतर नांदेड पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी वाहन चालक मालकांना आवाहन केले आहे की वाहनांची मूळ कागदपत्रे दाखवून मालकी हक्क सांगून वाहने घेऊन जावे








