नांदेड – नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळा आनावरन समारंभावरून आता वादाची ठिणगी उडाली आहे.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळा आणावरन कार्यक्रमाचे खा. रवींद्र चव्हाण यांना निमंत्रण न दिल्याने खा.रवींद्र चव्हाण हे संतापले असून आयुक्तावर हक्क भंगाची करवाई करण्याची सुतोवाच केले आहे काल एका पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले अजून पर्यंत मला या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्यामुळे मी या कार्यक्रमाला जाऊ शकत नाही वास्तवात महानगरपालिकेने खासदारांना निमंत्रण देणेच नव्हे तर त्यांच्याशी चर्चा करूनच कार्यक्रमाची रूपरेषा आखावी असा प्रोटोकॉल असूनही नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डोईफोडे यांनी हा प्रोटोकॉल न पाळल्यामुळे त्यांच्यावर हक्क भंग करण्याची वेळ आलेली आहे असे त्यांनी बोलून दाखवली आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळा अनावरणासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपाचे नेते येत असून या सर्व कार्यक्रमाची रूपरेषा माजी मुख्यमंत्री व खा. अशोकराव चव्हाण यांच्या आखणीतून होत असल्याचे दिसून येत आहे असेही ते म्हणाले.









One Comment
Hello! I’ve been following your website for a while now and finally got the courage to go ahead and give you a shout out from Austin Tx! Just wanted to tell you keep up the excellent work!