नांदेड : हुंडा, थाटबाट, अनाठायी खर्चाला बगल देत विवाहाला चालना देण्यासाठी पंचशील प्रतिष्ठाण व बौद्ध विवाह मेळावा महिला समितीच्या वतीने येथील चांदोजी पावडे मंगलकार्यालयात रविवारी (ता.25) आयोजित तिसऱ्या ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळाव्यात 29 जोडपी विवाहबद्ध झाली.
मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार अध्यक्षस्थानी होते. यावेळी कार्यकारी अभियंता अशोक येरेकर , मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय घोडके , सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई बालाजीराव कल्याणकर , सामाजिक कार्यकर्त्या ऍड . आशा गाडेकर , अस्मिता दिघे हे विशेष अतिथी, आंबेडकरी चळवळीतील नेते सुरेशदादा गायकवाड , बसपाचे मराठवाडा प्रभारी मनीष कावळे, डॉ राजेश्वर पालमकर , कार्यकारी अभियंता अण्णासाहेब कांबळे , डॉ. विजय गोणारकर , बौद्ध महासभेचे नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष गणपत गायकवाड , अनिताताई इंगोले , प्रफुल्ल सावंत , अभि. यशवंत गच्चे , विठ्ठलराव पावडे , सुरेश हटकर , यादवराव भवरे , सुनिल भरणे , अभि. प्रदीप काळे , डॉ. सुनिल भवरे , अंजली मुनेश्वर , आर.बी. मादळे , महेंद्र कावळे , निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी विजय डोंगरे , भिमराव शिंगाडे , भगवानराव धबडगे , सुभाष काटकांबळे , धम्मा कदम , चंद्रमुणी भरणे , नानकसाई फाऊंडेशनची पंढरीनाथ बोकारे , माधव जमदाडे आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
ऋषीपठण सेवाभावी संस्थेची अध्यक्ष भदन्त पय्याबोधी थेरो यांनी सर्वांना त्रिशरण , पंचशील व धम्मदेसना दिली. भारतीय बौद्ध महासभेच्या संस्कार विभागाचे बौद्धाचार्य सा.ना. भालेराव व सुरेश लोकडे यांनी मंगल परिणय विधी पार पाडला. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. बौद्ध विवाह मेळावा महिला समितीच्या अध्यक्षा सुनिता भरतकुमार कानिंदे यांनी आभार मानले.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त नामदेव पद्मणे व थायलंड येथे भारतातील पहिल्या श्रामणेरी झालेल्या जनाबाई पोपुलवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्षा रमाताई पाटील , कुसूम धोटे , कार्याध्यक्षा पुष्पा भरणे , सचिव निर्मला नरवाडे , सहसचिव दिशाताई नांगरे , कोषाध्यक्षा सुनिता वासाटे , सह कोषाध्यक्षा वैशाली सोनसळे , सल्लागार : डॉ. करुणा जमदाडे , मनोरमा कावळे , ज्योती कदम , पद्मिनीताई इंगोले, विमलताई कीर्तने , शैलजा लोणे , प्रतिमा भगत , वनिता उमरे , सुप्रिया रावळे , डॉ. सुजाता कांबळे , अनुप्रिया अभंगे यांनी तसेच करुणा अभि. वसंत वीर , वंदना अभि. भीमराव धनजकर , क्रांती राहूल प्रधान , अभियंता भरतकुमार कानिंदे , गुणवंत भगत , सदाशिव गच्चे , प्रेमदास घुले , कोंडिबा वासाटे , टी.पी. वाघमारे , विजय रावळे , विजय पोपुलवार , गौतम कांबळे , संजय कानिंदे ,आदिंनी परिश्रम घेतले.
संयोजन समितीच्यावतीने वधूस शुभ्र साडी, चांदीचे जोडवे, पैंजन , धम्मचक्र , वरास पांढरा ड्रेस देण्यात आला. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने नव दाम्पत्यांना बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ व विवाह प्रमाण पत्र देण्यात आले.
