नांदेड – १ जूनला दशमेश हाॅस्पिटल मध्ये मेंदू आणि मनक्याचे आजार, ब्रेन ट्युमर ट्रायजेमिनल न्यूरलजिया आणि मणक्याच्या समस्या वेळीच निदान व त्वरित योग्य व माफक दरात उपचार शिबिराचे मार्फत करण्यात येणार आहे.
हे शिबिर महाराष्ट्रातील प्रख्यात न्यूरो फिजीसीयन डाॅ दिपक आयवले व न्यूरोसर्जन डाॅ.अमित आयवले या बंधू द्वय, ख्यातकिर्त सोलारिस हाॅस्पिटल ठाणे मुंबई व अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट ठाणे मुंबई यांच्या वतीने तथा ज्येष्ठ नागरिक संघ उ.म.प्रा. वि.फेस्काॅम नांदेड व दशमेश हाॅस्पिटल नांदेड यांच्या सहकार्याने घेण्यात येत आहे. या शिबिरास संत बाबाजींचा शूभाशिर्वाद लाभणार आहे. हे शिबिर विना मुल्य तथा निशुल्क आहे.तपासण्या व आॅपरेशन लागल्यास ते सुद्धा माफक दरात केले जाणार आहेत.हे शिबिर एक जून रोजी सकाळी १० ते संद्याकाळी ५.०० वाजे पर्यंत चालणार आहे.या शिबिरास येतांना रूग्णांनी आपला पूर्व ईतिहास म्हणजे रिपोर्ट यापूर्वि झालेल्या तपासण्या,चालू असलेल्या औषधांचा लेखाजोखा तथा फाईल बरोबर आणावयाची आहे.
हे शिबिर म्हणजे “गंगा आली रे अंगणी” अर्थात सामान्यांना एक वरदानच ठरणार आहे! तेव्हा या संधीचं सोनं करून जास्तीत जास्त गरजूनां या शिबिराचा लाभ आपण सर्वानीं सर्वांना करून द्यावा असे आवाहान अध्यक्ष डाॅ.हंसराज वैद्य,सचिव प्रभाकर कुंटूरकर, सचखंड गुरूद्वारा अधिक्षक सरदार गुरूबचन सिंघजी शिलेदार,सोलारिस हाॅस्पिटलच्या मुंबईच्या पुष्कला ताई यांनी केले आहे.*
One Comment
Aw, this was a really nice post. In idea I want to put in writing like this additionally – taking time and precise effort to make an excellent article… however what can I say… I procrastinate alot and on no account appear to get something done.