माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळा अनावरण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे उच्च पदाधिकारी अमित शहा नांदेड ला येत असल्याने त्यांच्या हातून पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा असलेले माजी मंत्री डी. पी. सावंत यांनी तो मी नव्हेच ही भूमिका घेऊन भाजपा प्रवेश करणार नाही असे बोलून दाखविले
राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही हे असे असले तरी एकाच पक्षात दोनदा प्रवेश करण्याची लालसा मनात ठेवून पुन्हा माझी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करून घ्यावा या लालसेने खा. अशोकराव चव्हाण यांचे जवळचे मित्र व त्यांच्या संस्थेचे सचिव माजी मंत्री डी. पी. सावंत यांनी मी भाजपा प्रवेश करणार नाही असे सुतोवाच एका वृत्तपत्राला बोलताना दिले परंतु वास्तव असे आहे की मुदखेड मतदारसंघातून खा. अशोकराव चव्हाण यांची मुलगी श्रीजया अशोक खासदार यांच्या निवडीनंतर खा. अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानी माजी मंत्री डी.पी. सावंत यांनी भाजपाचा उपरणा गळ्यात घालून भाजपा प्रवेश केल्याचे दाखविण्यात आले तसे छायाचित्रही बाहेर पडले या छायाचित्रांमध्ये खा.अशोकराव चव्हाण माजीमंत्री डी.पी. सावंत आणि नवनियुक्त आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण हे दिसत आहेत विशेष म्हणजे आमदार श्रीजय चव्हाण यांचा हात आपल्या हातात घेऊन घट्ट धरलेला आहे जणू काही आता मी भाजपाची साथ सोडणार नाही असे सांगत असतील.
परंतु नांदेडमध्ये दिनांक 26 मे रोजी भाजपाचे सर्व सर्व अमित भाई शहा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असल्याने कदाचित माजी मंत्री डी.पी. सावंत यांच्या मनात पुन्हा एकदा भाजपा पक्षात प्रवेश करण्याची इच्छा झाली की काय म्हणून त्यांनी तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली असल्याची चर्चा आता नांदेडमध्ये ऐकवास मिळत आहे








