नांदेड : जनसेवेसाठी सदैव तत्पर असणारे राज्यसभा खा.डॉ. अजित गोपछडे यांचे अंत्योदय जनसंपर्क कार्यालयाचा सोहळा उद्या दिनांक 26 मे रोजी दुपारी तीन वाजता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आणि राजाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. आयोजित अंत्योदय जनसंपर्क कार्यालय सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन खा. डॉ .अजित गोपछडे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून करण्यात आले आहे.
वर्कशॉप ते आनंदनगर रोडवरील नूतन वास्तूत खा. डॉ . अजित गोपछडे यांच्या अंत्योदय जनसंपर्क कार्यालय लोकसेवेसाठी तयार करण्यात आले आहे . या कार्यालयाचे उद्घाटन आणि खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या एक वर्षाच्या कार्य अहवालाचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे . खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांच्या अंत्योदय या जनसंपर्क कार्यालयात पहिल्या माळावर राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी , जनतेचे अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी, विविध शासकीय कार्यालयात लागणाऱ्या कागदपत्रांच्या देवाण-घेवाणीसाठी विशेष कक्ष असणार आहेत. दुसऱ्या माळ्यावर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसाठी बैठक व्यवस्था , या ठिकाणी विविध बैठका , पत्रकार परिषदा घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे तर तिसऱ्या माळ्यावर इलेक्ट्रॉनिक मीडिया , प्रिंट मीडिया , सोशल मीडिया यांच्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली असून याच ठिकाणी भोजन कक्षाची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. अत्याधुनिक सोयी सुविधांसह उभारण्यात आलेल्या अंत्योदय जनसंपर्क कार्यालयाच्या सोहळ्यासाठी उद्घाटक म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांची उपस्थिती राहणार आहेत तर कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असणार आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती राहणार असून यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण , नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे , माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण , मराठवाडा विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे , आ. भीमराव केराम , आ. डॉ. तुषार राठोड, आ. राजेश पवार , आ. जितेश अंतापूरकर, आ. श्रीजया चव्हाण यांचीही यावेळी उपस्थित राहणार आहे. आयोजित अंत्योदय जनसंपर्क कार्यालय सोहळ्यास भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी , कार्यकर्ते आणि जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन खा. डॉ. अजित गोपछडे, माजी आमदार तथा भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष अमरनाथ राजुरकर , जिल्हाध्यक्ष डॉ . संतुकराव हंबर्डे , जिल्हाध्यक्ष ऍड. किशोर देशमुख यांनी केले आहे.









One Comment
Hi would you mind letting me know which webhost you’re working with? I’ve loaded your blog in 3 completely different internet browsers and I must say this blog loads a lot faster then most. Can you recommend a good hosting provider at a honest price? Many thanks, I appreciate it!