नांदेड – जागतिक पर्यावरण दिन मोहिमेची रेल्वे विभागीय कार्यालय नांदेड येथे उत्साहात सुरुवात करण्यात आली. या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ठ प्लास्टिक प्रदूषण संपवा हे आहे.
जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर, 22 मे, 2025 रोजी DRM कार्यालय, नांदेड येथे प्लास्टिक प्रदूषण संपवा या विषयावर आधारित 15 दिवसांच्या जनजागृती मोहिमेची उत्साहपूर्ण सुरुवात झाली.
या मोहिमेअंतर्गत विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण रक्षण आणि प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी आपली बांधिलकी दर्शवली. या कार्यक्रमात श्री प्रदीप कामले, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांची मुख्य उपस्थिती होती
ही मोहीम नागरिकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आणि स्वच्छ, हरित भविष्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करते.
या मोहिमे अंतर्गत येणाऱ्या पंधरा दिवसात दिनांक 22 मे ते 05 जून दरम्यान नांदेड विभागातील विविध रेल्वे स्थानकावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
One Comment
I gotta favorite this website it seems extremely helpful extremely helpful