नांदेड,13- जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील उर्वरित शिक्षक संवर्गाच्या बदली प्रक्रिया आज यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्या. .
या बदल्यांमध्ये एकूण 30 बदल्यांचा समावेश आहे. त्यामध्ये- अराजपत्रित मुख्याध्यापक संवर्गात विनंतीवरून एक बदली करण्यात आली. केंद्रप्रमुख प्रशासकीय -1 तर पेसा विनंतीेने 3, एकूण 4 बदल्या झाल्या आहेत. माध्यमिक शिक्षक (उर्दू माध्यम) विनंतीने 1 बदली करण्यात आली. माध्यमिक शिक्षक (मराठी माध्यम) प्रशासकीय 7, पेसा विनंती 11, नॉन पेसा/उर्वरित तालुका समतोल 6 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बदली प्रक्रियेसाठी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, उपशिक्षणाधिकारी अवधूत गंजेवार सहाय्यक प्रशासन अधिकारी राघवेंद्र मदनुरकर यांची उपस्थिती होती.
तसेच या कामात श्री सुधीर गुट्टे, विकम रेनगुंटवार, मंगेश ढेबरे, स्मिता पोपुलवार, तसेच सर्व गट शिक्षणाधिकारी, तसेच विभागातील सर्व कर्मचारी यांनी साहाय्य केले.
शिक्षण विभाग अंतर्गत माध्यमिक शिक्षक व इतर शिक्षक संवर्ग कर्मचाऱ्यांच्या बदल्या पारदर्शकपणे केल्याबद्दल संघटनेच्या वतीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, तसेच डॉ.सविता बिरगे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), राजकुमार मुक्कावार उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) यांचा शिक्षक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी उपशिक्षणाधिकारी अवधूत गंजेवार, सहाय्यक प्रशासन अधिकारी राघवेंद्र मदनुरकर, धनंजय गुमलवार, गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे, केशव मेकाले,शिक्षक संघटनेचे संजय शेळगे, श्री मांजरमकर श्री हंगरगे, तसेच शिक्षक संघटनेचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषद अंतर्गत बदली प्रकरणात पारदर्शकता आणल्याबद्दल शिक्षक संघटना कडून मुकाअ कावली यांचा सत्कार
