दिनांक- जिल्हाधिकारी कार्यालयात आज मा.खासदार किरीट सोमय्या जी यांची भेटी दरम्यान वाहन चालक संघटनेच्या वतीने भेट घेऊन महाराष्ट्र राज्य मध्ये व भारतातील सर्व राज्यांत वाहन चालक व शिपाई (परिचर ) पद भरती प्रक्रिया नव्याने शुरुवात करुन,त्या भरती प्रक्रिया मध्ये महाराष्ट्र राज्य मधील वाहन चालक बंधु कंत्राटी पद्धतीने १० / ते १५, वर्षांपासून कार्यरत आहेत त्यांना वाहन चालक पदभरती मध्ये, प्राधान्य देण्यात यावे, व शिपाई (परिचर ) पद भरती प्रक्रिया नव्याने सुरू करण्यात यावी म्हणून, आदरणीय श्री किरीट सोमय्या साहेबांना वाहन चालक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले या दरम्यान, संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष श्री सतिश चिंतल, नांदेड जिल्हा वाहन चालक शाखेचे , उपाध्यक्ष तथा प्रसिद्धी प्रमुख, शेख इस्माईल, व सह सचिव श्री प्रभाकर शिंदे उपस्थित होते.