Home / राज्य / लोकशाही मूल्यांची जपणूक व्हावी यासाठी जनतेने आग्रही असले पाहिजे – महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचे आवाहन

लोकशाही मूल्यांची जपणूक व्हावी यासाठी जनतेने आग्रही असले पाहिजे – महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचे आवाहन

नांदेड : संविधानाधिष्ठीत लोकशाही मूल्यांची जपणूक झाली तरच जनतेचे स्वराज्य प्रस्थापित होत असते. परंतु विद्यमान सरकार ही मूल्ये पायदळी तुडवत आहे. जनतेने जनतेचे स्वराज्य प्रस्थापित व्हावे म्हणून लोकशाही मूल्यांसाठी आग्रही असले पाहिजे असे आवाहन महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले. ते “हम भारत के लोग” या मंचाद्वारे आयोजित कार्यक्रमात येथील नियोजन भवनात व्याख्यानादरम्यान बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती होती.
“भारतीय संविधान आणि माझी भूमिका” या विषयावर मार्गदर्शन करताना तुषार गांधी पुढे म्हणाले की, पाचशे-हजार रुपयांना आपले मतदान विकणारा गरीब, लाचार नागरिक निर्माण होणे हे येथील राजकीय व्यवस्थेचे फार मोठे अपयश आहे. भारतीय संविधानाने जनतेला सार्वभौम मानले आहे. परंतु आज जनतेचे हे सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. ‘हम भारत के लोग’ हा मंच थेट राजकीय पक्ष म्हणून राजकारणात उतरणार नसला तरी या मंचाचे तत्व आत्मसात केलेल्या नागरिकांची शक्ती समविचारी राजकीय पक्षांच्या पाठिशी उभी करण्याचे काम केले जाणार आहे. सुरुवातीला महाराष्ट्रात हे काम उभे केले जाणार असून आम्ही प्रत्येक जिल्ह्यातील, तालुक्यातील लोकांपर्यंत पोहचणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. अहिंसा, एकता आणि संविधानाच्या मूल्यांसंदर्भात त्यांनी भूमिका मांडली. ११ मे रोजी सायंकाळी ५ वाजता हे व्याख्यान संपन्न झाले. तत्पूर्वी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांनीही आपले विचार मांडले. प्रारंभी कार्यक्रमाचे मुख्य संयोजक श्याम निलंगेकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका प्रस्ताविक करून विषद केली.

Oplus_131072

या कार्यक्रमास शरद कदम, फेरोज मिठीबोरिवला, गुड्डी, अनिल मोरे, कॉ.विजय गाभणे, कॉ.प्रदीप नागापूरकर, डॉ.किरण चिद्रावार, ऍड.सुरेंद्र घोडजकर, माजी महापौर आनंद चव्हाण, डॉ.अनिल शिरसाठ, कॉ.गंगाधर गायकवाड, प्रा.डॉ.प्रल्हाद हिंगोले, मो.अल्ताफ हुसेन, मारोतराव देगालूरकर, इंजि.भारत कुमार कानिदे, सोपानराव मारकवाड, पत्रकार रमेश मस्के, प्राचार्य बाबाराव नारवडे, कॉ.शिवाजी फुलवळे, नवनीत गांधी, प्रा.डॉ.लक्ष्मण शिंदे, प्रदीपकुमार जैन, प्रा.हणमंदलू तमलूरकर, शकीला शेख, कॉ. दिगंबर घायाळे, डॉ.रेखाताई चव्हाण, प्रभाकर हिंगोले, कॉ. जयराज गायकवाड, कॉ. सुभाषचंद्र गजभारे, शेख इमदाद भाई, कैलास शिंदे, मुरलीधर कांबळे, कॉ.देवराव नारे, सत्यपाल सावंत, संजय वाघमारे, पुष्पा कोकीळ, डॉ विजयकुमार माहुरे,आदींचा समावेश होता. म. अल्ताफ यांनी सूत्रसंचालन केले तर काॅ. उज्वला पडल्यावर यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयकुमार डोईबळे, ऋषिकेश निलंगेकर, सम्यक खोसले दीपक पवळे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल