नांदेड – दिनांक १०.०५.२०२५ रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, नांदेड मुख्य प्रशासकीय इमारत येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोक अदालतीकरीता मालमत्ता धारकांना आपल्या मालमत्ता कराविषयी असलेल्या तक्रारीचे निवारण करुन घेण्याकरीता गुचित केले व मालमत्ता कराचा मरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
राष्ट्रीय लोक अदालती करीता मा. प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री. सुनिल जी. वेदपाठक, मनपा आयुक्त मा.श्री डॉ. महेशकुमार डोईफोडे, मा. सचिव विधी सेवा प्राधीकरण श्रीमती. दलजीत कौर मनीपालसिंघ जज, मा.न्यायाधिश श्री. एम.आर. सोवनी, ४ थे सह दिवाणी न्यायाधिश वरीष्ठ स्तर, नांदेड (पॅनल प्रमुख), अॅड, श्रीमती, रतन, अति. आयुक्त मा. श्री गिरीष कदम, उपआयुक्त (कर) श्री अजीतपालसिंध संधु, सिस्टीम मॅनेजर श्री सदाशिव पतंगे मनपाच्या सहा क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी श्री मिर्झा फरहतुल्लाह वेग, श्री रमेश चवरे, श्री रावण सोनसळे, श्री गौतम कवडे, श्रीमती. निलावती डावरे, श्री. राजेश जाधव, न्यायालयीन कर्मचारी श्री एन.बी. शिंदे, श्री. एम.पी. सावरकर, श्री. आर.व्ही. व्हडगीर सर्व क्षेत्रिय कार्यालयाचे वसुली पर्यवेक्षक, वसुली लिपीक व त्यांचे सहाय्यक उपस्थित होते. राष्ट्रीय लोक अदालतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेस जे मनपा मालमत्ता कर थकबाकीदार आहेत त्यांना नोटीस वाटप करण्यासाठी देण्यात आल्या होत्या, मालमत्ता कर थकबाकीदारांना नोटीसीचे वाटप करण्यात आले.
आज दिनांक १०.०५.२०२५ रोजी सकाळी १०.३० वा. पासुन लोक अदालतीस सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय लोक अदालतीसाठी आलेल्या मालमत्ता धारकांना मनपा आयुक्त मा.श्री. डॉ. महेशकुमार डोईफोडे, मा. न्यायाधिश श्री. एम.आर. सोवनी, (पॅनल प्रमुख), यांनी कायदेविषयक बाबी समजावून सांगितल्या व मालमत्ताधारकांच्या तक्रारीचे निरसन केले. आज झालेल्या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये ९७९ मालमत्ताधारकांनी थकबाकीवरील शास्तीत ८०% सुट योजनेचा लाभ घेवुन एकुण रु. २,००,२८,७६०/- (रुपये दोन कोटी अठ्ठावीस हजार सातशे साठ फक्त) मालमत्ता कर व १७० मालमत्ताधारकांनी रुपये- २१,६४,१२४/- (रुपये-एकेवीस लाख चौसष्ट हजार एकशे चोवीस फक्त) एवढा पाणीपट्टी कर असे एकुण ११४९ मालमत्ताधारकांनी मालमत्ता कर व पाणीपट्टी कर असा एकुण रु. २,२१,९२,८८४/- (रुपये दोन कोटी एकेवीस लक्ष ब्याण्णव हजार आठशे चौ-याऐंशी फक्त) भरणा केला आहे.
ज्या मालमत्ताधारकांनी मनपा मालमत्ता कराचा भरणा केला नाही त्यांनी तात्काळ कर भरणा करावा व भविष्यात मनपाकडून होणा-या जप्ती, नळबंद करणे, ड्रेनेज बंद करणे, लिलाव करणे या सारख्या कार्यवाही टाळाव्यात असे आवाहन मनपा आयुक्त मा. श्री. डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी मालमत्ताधारकांना केले.
