Home / राजकारण / मनीषभाऊ कावळे यांची बहुजन समाज पार्टीच्या मराठवाडा झोन प्रभारीपदी नियुक्ती

मनीषभाऊ कावळे यांची बहुजन समाज पार्टीच्या मराठवाडा झोन प्रभारीपदी नियुक्ती

नांदेड – बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा.बहन कुमारी मायावतीजी यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.सुनील डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनीषभाऊ कावळे यांची मराठवाडा झोन प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती मराठवाड्यातील पक्ष संघटन बळकट करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात असून, सामाजिक न्याय, संविधान व बहुजन हिताच्या चळवळीला नवसंजीवनी मिळणार आहे. मनीषभाऊ हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असून, त्यांच्या अनुभवाचा लाभ पक्ष संघटन आणि जनजागृती मोहिमांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
या नियुक्तीमुळे मराठवाडा विभागात पक्ष कार्याला नवचैतन्य प्राप्त होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आह सदर प्रसंगी बहुजन समाज पार्टीचे अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या ह्या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल