Home / देश / महानगरपालिकेत आयुक्तांच्या हस्ते अग्निशमन वाहनांचे लोकार्पण

महानगरपालिकेत आयुक्तांच्या हस्ते अग्निशमन वाहनांचे लोकार्पण

नांदेड :- नांदेड महानगरपालिका सेवेचे बळकटीकरण करण्यासाठी अग्निशमन विभागाकरीता जिल्हा वार्षीक योजनेतुन प्राप्त झालेल्या नविन ०३ अत्याधुनिक अग्निशमन वाहनांचे लोकार्पन दि.०८.०५.२०२५ रोजी *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेकशकुमार डोईफोडे* यांच्या हस्ते करण्यात आले.
महापालिकच्या अग्निशमन विभागा तर्फे नांदेड शहर, संपुर्ण जिल्हा व जिल्ह्या बाहेर सुध्दा सेवा पुरविली जाते. अग्निशमन व आणीबाणी सेवा ही अत्यावश्यक सेवा असुन आग, रेस्क्यु, नैसर्गिक आपत्ती वा मानव निर्मित दुर्घटनेमध्ये तातडीने आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यकत्या संसाधनासह सजग राहुन सेवा द्यावी लागते. नांदेड शहराची वाढती लोकसंख्या तसेच शहरातील व शहरा लगतच्या क्षेत्रात व्यावसायीक इमारती, मॉल्स, दवाखाने, औद्योगिक इमारती यांचे वाढते प्रमाण विचारात घेता नांदेड महानगरपालिकेच्या अग्निशमन सेवेचे बळकटीकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी जिल्हा वार्षीक योजनेतुन उपलब्ध करुन दिलेल्या निधीनुसार नव्याने ०३ अत्याधुनिक वाहनांची बांधणी करुन Quick Response Vehicle with water mist Technology व Mini Fire Water Tender on Tata 610 SFC or Equivalent आणि Q-250 Rescue Vehicle या तीन वाहनांची महापालिकेच्या अग्निशमन ताफ्यात भर पडली आहे.

सदरील तिन्ही अग्निशमन वाहने विविध आगीच्या घटनास्थळी जलद गतीने पोहचुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी मनपा आयुक्तांच्या हस्ते या वाहनांचे लोकार्पन करण्यात आले. या तीन नविन वाहनांची मनपा ताफ्यात भर पडल्यामुळे महापालिकेची अग्निशमन सेवा अधिक सक्षम होणार असल्याचे यावेळी आयुक्तांनी प्रतिपादन केले.
याप्रसंगी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह उपआयुक्त सुप्रिया टवलारे, नितीन गाढवे, स.अजितपालसिंघ संधु, शहर अभियंता सुमंत पाटील, लेखाधिकारी श्रीनिवास चन्नावार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, सहाय्यक आयुक्त मो. गुलाम सादेक, उपअभियंता प्रकाश कांबळे, दिलीप टाकळीकर, सतीश ढवळे, अग्निशमन अधिकारी के.जी. दासरे, निलेश कांबळे, क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे, रावण सोनसळे, गौतम कवडे, निलावती डावरे, अग्निशमन विभागाचे योगेश पेरकेवाड यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Advertisements

लाइव टीवी

लाइव क्रिकेट

बाज़ार लाइव

राशिफल