नांदेड :- नांदेड शहरातील नागरीकांसाठी महानगरपालिकेने विशेष योजनेची सुरुवात केली असुन अनधिकृत नळ जोडणी अधिकृत करण्याची सुवर्ण संधी आता शहरातील नागरीकांना प्राप्त होणार आहे. *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे* यांच्या पुढाकाराने ज्या नागरीकांकडे अनधिकृत नळ जोडणी आहे त्या नागरीकांना नळ जोडणी अधिकृत करुन घेण्याची विशेष योजना महानगरपालिकेने सुरु केली असुन यायोजने अंतर्गत दिनांक ०१.०५.२०२५ ते ३१.०५.२०२५ या कालावधीत नागरीकांना नळ जोडणी अधिकृत करुन घेता येणार आहे.
नांदेड शहरामध्ये महानगरपालिके मार्फत नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येतो त्याअनुषंगाने काही मालमत्ताधारक नियमितपणे पाणीपट्टी मनपाकडे भरणा करत असतात परंतु काही मालमत्ताधारक अनाधिकृतपणे पाणी वापर करीत असून अद्याप नळ असल्याची नोंदणी केली नसल्यामुळे अधिकृत नळ धारकांच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो तसेच महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. त्याकरीता दि.०१.०५.२०२५ ते ३१.०५.२०२५ पर्यंत प्रचलित दरानुसार नळ जोडणी शुल्क पाणी पुरवठा विभाग, मुख्य कार्यालय, नांवाशमनपा, नांदेड येथे भरणा करुन नळ जोडणी अधिकृत करुन घेण्याची मुभा आता शहरातील नागरीकांना प्राप्त होणार आहे. नागरीकांनी अनाधिकृत नळ जोडणी अधिकृत करण्यासाठी दिनांक ३१.०५.२०२५ पर्यंत अनधिकृत नळ जोडणी अधिकृत करुन घ्यावी, यानंतर विशेष पथकाच्या तपासणीत अनाधिकृत नळ जोडणी आढळून आल्यास अनाधिकृत नळ धारकांवर सार्वजनिक संपतीस हानी प्रतिबंध अधिनियम १९८४ कलम (३) अन्वये गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा महानगरपालिका आयुक्तांनी दिला आहे.
त्याचप्रमाणे मनपा हद्दीतील चौफाळा ते बिलाल नगर रस्त्यावर एकुण १७ नागरीकांनी अनधिकृतपणे नळ जोडणी घेतल्या कारणाने महानगरपालिकेने संबंधीत नळधारकांवर सार्वजनिक संपत्तीचे नुकसान प्रतिबंधक अधिनियमानुसार इतवारा पोलीस स्टेशन येथे दि.२५.०७.२०२५ रोजी FIR दाखल केला असुन या भागात काम करणाऱ्या महानगरपालिकेचे अधिकृत प्लंबर संदिप गंगाधर सोनटक्के यांचा प्लंबर परवाना निलंबित करण्याचे आदेश महापालिकेच्या वतीने निर्गमीत करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहरात अनधिकृत नळ जोडणी घेणाऱ्या नागरीकांचे व गैरमार्गाने नळ जोडणी देणाऱ्या प्लंबरचे चांगलेच धाबे दणानले असुन मनपा आयुक्तांची प्लंबरला जबर दणका दिला आहे.

शहरातील नागरीकांनी कोणत्याही पध्दतीने अनधिकृत नळ जोडणी न घेता महापालिकेच्या विशेष योजनेचा लाभ घेऊन प्रचलित शुल्क भरुण नळ जोडणी अधिकृत करुन घेऊन गुन्हा दाखल होण्यासारखी अप्रिय घटना टाळावी, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.









One Comment
I have to point out my respect for your kindness in support of folks that need help with the content. Your special dedication to getting the message around was rather invaluable and has usually empowered somebody much like me to reach their pursuits. Your new useful tips and hints implies a great deal a person like me and extremely more to my mates. Thanks a ton; from everyone of us.