गोवा येथे लॉयंस इंटरनेशनल च्या प्रांत 3234एच 2 च्या प्रतिष्ठेच्या द्वितीय ऊप प्रांतपाल पदासाठी च्या अतिटतीच्या निवडणूकीत पीएमजेएफ लॅायन योगेश जायसवाल हे प्रचंड मतांनी विजयी झाल्याबद्दल लायन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या वतीने धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.
नांदेड येथील लॅायन्स कल्ब नांदेड च्या अध्यक्षा लॅा.डॅा ज्योती जांगीड ,लॅायन्स कल्ब नांदेड मिडटाऊन चे अध्यक्ष लॅा. मनिष माकन , लॅायल्स कल्ब नांदेड प्राईड चे अध्यक्ष लॅा .मोहन देशमुख ,लॅायन्स कल्ब नांदेड सफायरचे अध्यक्ष लॅा .निलेश मुनोत ,लॅायन्स कल्ब नांदेड सेन्ट्रल चे अध्यक्ष लॅा .शिवाजी पाटील आणि लॅायन्स कल्ब नांदेड एंन्जल्स च्या अध्यक्षा लॅा .निलम कासलीवाल यांच्या वतीने सामुहीक भव्य सत्कारा चे आयोजन करन्यात आले होते.यावेळी लॅायन्स परिवाराचे प्रमुख माजी प्रांतपाल दिलीप मोदी लॅा जयेश ठक्कर ,लॅा नारायनलाल कलंत्री ,लॅा .ॲड प्रविन अग्रवाल लॅा ,डी पी सावंत , रिजन चेअर पर्सन कन्व्हेनर लॅा रवी कडगे, लॅा सतिश सामते लॅा किशोर पाटनी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना दिलीप ठाकूर यांनी असे सांगितले की, लॅा योगेश जायसवाल गेल्या 10 ते 12 वर्षा पासुन लॅायन्स ईन्टरनॅशनल च्या प्रांत 3234 एच 2 मध्ये सक्रीय असुन त्यांनी विविध पदावरुन कार्य करुन नाव लौकिक प्राप्त केला आहे त्यांची जिद्द ,चिकाटी परिश्रम सेवाभाव ,नेमुन दिलेले कार्य त्यांनी यशस्वी पुर्ण केल्या मुळे त्यांचा त्यांना या निवडणुकीत फायदा झाला. त्यांचा मित्र परिवार सर्वदूर पसरलेला आहे. त्यांच्या आर्थिक योगदानामुळेच गेल्या पंचवीस वर्षांपासून नांदेड येथे गोदावरी गंगा पूजन हा उत्सव यशस्वी होतो. त्यांच्या विजयाने एक नविन इतिहास लिहिला आहे. लॅा योगेश जायसवाल व लॅा अमृता जायसवाल यांचा शॅाल,श्रीफळ,मोत्याची माळ व नॅपकिनचा पुष्पगुच्छ देऊन दिलीप ठाकूर व माजी नगरसेविका जयश्री ठाकूर यांनी सत्कार केला .या कार्यक्रमासाठी नांदेड लायन्स परिवारातील अनेक सदस्य मोठया संख्येत उपस्थित होते.








