नांदेड :- महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार दि.२८ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ च्या अंमबलबजावणीस दहा वर्ष पूर्ण होत असल्याने सदरील दिवस हा महानगरपालिकेत सेवा हक्क दिन म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे* यांच्या हस्ते सेवा हक्क प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान महानगरपालिकेच्या शिक्षण विभागा मार्फत लोक सेवा हक्क दिनाचे महत्व पटवुन देण्यासाठी पथनाट्याचे सादरणीकरण करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु, सहाय्यक संचालक नगरचनाकार पवन आलुलकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ.जनार्दन पक्वान्ने, लेखाधिकारी श्रीनिवास चन्नावार, सहाय्यक आयुक्त मो.गुलाम सादेक, सिस्टिम मॅनेजर सदाशिव पतंगे, उपअभियंता संघरत्न सोनसळे, क्षेत्रिय अधिकारी रावण सोनसळे, गौतम कवडे, निलावती डावरे, अग्निशमन अधिकारी के.जी.दासरे व महापालिकेतील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.









