भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उद्या सोमवारी, २८ एप्रिल रोजी पानभोसी ता. कंधार येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.
यावेळी सकाळी ८.३० वाजता पानभोसीच्या सरपंच राजश्रीताई भोसीकर यांच्या हस्ते पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण होणार आहे. सकाळी ११ वाजता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, प्रमुख अतिथी पानभोसीच्या सरपंच राजश्रीताई भोसीकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून पानभोसी मंठ संस्थानचे मठाधिपती गुरु गायबी नागेंद्र महाराज, भन्ते बोधिधम्मो, ना.जि.म.बँक चे उपाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, कंधार तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय भोसीकर, बौध्दाचार्य नामदेव जमदाडे, भिमसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र जोंधळे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष गवारे, वंचित बहुजन आघाडीच्या महिला तालुका उपाध्यक्ष ग्रामपंचायतीचे उपसरपंच शिवकुमार भोसीकर, ग्रामपंचायत सदस्य शेख सय्यद, विश्वाभर डुबूकवाड, शेख रहिमसाब, भानुदास वाघमारे, सविता नाईकवाडे, स्वरुपाताई लुंगारे, मंगलताई गोंड, शेख ताहेराबी, सुमधबाई जोंधळे यांची उपस्थिती राहणार आहे.
पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पानभोसी भीमजयंती मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र भोसीकर, उपाध्यक्ष मनोहर भोसीकर, कोषाध्यक्ष कंठीराम लुंगारे, सल्लागार शिवकुमार नरंगले, सचिव उत्तम जोंधळे, सहसचिव दिलीप जोंधळे, सदस्य माधव स्वामी, सदस्य एजाज भोसीकर, सदस्य शिवदास नाईकवाडे, सदस्य शिवराज गोंड, सदस्य शेख इसाक, सदस्य पंढरी कांबळे आदींसह भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा, समस्त गावकरी मंडळ पानभोसीच्या वतीने करण्यात आले आहे.