बालचंद यादव प्रस्तुत तराणा ग्रुपतर्फे दि. २७ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता येथील कुसुम सभागृहात निः शुल्क हिंदी फिल्मी गीतांचा ‘हम तुम्हे चाहते है एसे’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अभिनेता स्व. फेरोज खान, स्व. विनोद खन्ना यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बालचंद यादव यांनी केले आहे. कार्यक्रमात सहभागी गायक म्हणून प्रा. महेश महामुने, विजय निलंगेकर, नितीन सेलामोकर, लक्ष्मीकांत कुलकर्णी, डॉ. विश्वनाथ पारसेवार, बालचंद यादव, डॉ. चंद्रशेखर किसवे, लक्ष्मीकांत वकील, संतोष टाक, पुजा पारसेवार, अनुराधा पांडे, श्रद्धा दिक्षीत, ललीता दुगलच आदींचा सहभाग राहणार आहे. निवेदक अॅड. नईम ए. जी. व्हीडीओ व एलईडी आर. एम. सुर्वे यांची जबाबदारी राहणार आहे.